Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:29 PM2022-10-07T17:29:44+5:302022-10-07T17:30:02+5:30
अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कंपन्यांना बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारने आदेश काढला आहे.
कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर तीनही कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. पुढच्या तीन दिवसात तुमच्या कंपनीची ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश यात दिले आहेत. या कंपन्यांविरोधात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, यावर आता राज्य सरकारने कारवाई केली आहे.
देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
या तिनही कंपन्या ऑटो २ किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर १०० रुपये भाडे आकारतात, याअगोदर या कंपन्या नव्हत्या त्यावेळी २ किलोमीटरसाठी २० ते ३० रुपये भाडे आकारले जात होते. अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. या तक्रारीवरुन राज्य सरकारने कारवाई केली आहे.
राज्यात या कंपन्यांनी सेवा सुरू केल्यानंतर ऑटो रिक्षाचे भाडे वाढले असल्याच तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर कर्नाटक सरकारने गुरुवारी राज्य सरकारने कॅप कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. जर रिक्षा चालकांनी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना दंड ठोठावला जाईल, असंही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसच्या दोन आमदारांवर दारू पिऊन ट्रेनमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा आरोप, एफआयआर दाखल
या कंपन्या केवळ नियमानुसार ऑटो-रिक्षा चालविण्यास पात्र नाहीत. याचे नियम फक्त टॅक्सींसाठी आहेत. या कॅब कंपन्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून राज्यात ऑटो सेवा पुरवत असून ग्राहकांकडून मनमानी पद्धतीने निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात आहे, असं वाहतुक पोलिसांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.