सानिया मिर्झाला खेलरत्न पुरस्कार देण्यास कर्नाटक हायकोर्टाची स्थगिती
By admin | Published: August 26, 2015 04:39 PM2015-08-26T16:39:11+5:302015-08-26T16:39:11+5:30
ख्यातनाम टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास बुधवारी कर्नाटक हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. २६ - ख्यातनाम टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास बुधवारी कर्नाटक हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणा-या एच एन गिरीशा यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.
टेनिसमध्ये भारताचा ठसा उमटवाणा-या सानिया मिर्झाला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र यावर पॅराऑलिम्पियन एच एन गिरीशा यांनी नाराजी दर्शवली होती. गिरीशा यांनी २०१२ मध्ये झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक तर २०१४ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्य पदक पटकावले होते. क्रीडा मंत्रालयाच्या शिफारस समितीने माझ्या कामगिरीला डावलून सानिया मिर्झाची शिफारस केली अशी नाराजी गिरीशा यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात गिरीशा यांनी कर्नाटक हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. कर्नाटक हायकोर्टाने बुधवारी झालेल्या सुनावणीत सानिया मिर्झाला खेलरत्न पुरस्कार देण्यास स्थगिती दिली.