कर्नाटक उपांत्य
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:54+5:302015-02-21T00:49:54+5:30
कर्नाटक उपांत्य फेरीत
Next
क ्नाटक उपांत्य फेरीतरणजी करंडक : आसामविरुद्धची लढत अनिर्णितइंदूर : शतकवीर गोकुल शर्मासह फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आसाम संघाने विद्यमान चॅम्पियन कर्नाटक संघाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीची लढत अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर कर्नाटकने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कर्नाटक संघाने आसामपुढे विजयासाठी ६३८ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. कर्नाटक संघ विजयासह अंतिम चारमध्ये प्रवेश मिळविण्यास उत्सुक होता, पण आसामतर्फे गोकुल शर्मा (नाबाद १२७), के.बी. अरुण कार्तिक (९४) आणि पल्लवकुमार दास (७१) यांनी चमकदार फलंदाजी करीत कर्नाटकच्या स्वप्नावर पाणी फेरले. आसामने दुसऱ्या डावात ४ बाद ३३८ धावांची मजल मारली. कालच्या बिनबाद ३२ धावसंख्येवरून पुढे खेळताना आसामची ३ बाद १२८ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर गोकुल व अरुण कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी २०३ धावांची भागीदारी करीत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)