कश्यप-प्रणय जेतेपदासाठी झुंजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:10 AM2017-07-24T01:10:46+5:302017-07-24T01:10:46+5:30

बॅडमिंटनमध्ये पुरुष विभागात भारतीय खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने

Kashyap and Pranay will fight for the title | कश्यप-प्रणय जेतेपदासाठी झुंजणार

कश्यप-प्रणय जेतेपदासाठी झुंजणार

googlenewsNext

अनाहीम (कॅलिफोर्निया) : बॅडमिंटनमध्ये पुरुष विभागात भारतीय खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपने अमेरिकन ओपन ग्राप्री गोल्ड फायनलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता जेतेपदासाठी कश्यपला अंतिम फेरीत मायदेशातील सहकारी एच.एस प्रणयसोबत लढत द्यावी लागेल.
आॅक्टोबर २०१५ मध्ये पोटरीच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेणाऱ्या कश्यपने तेव्हापासून आतापर्यंत २१ महिन्यांच्या कालावधीत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. दुखापतीमुळे संघर्ष करीत असलेल्या प्रणयने गेल्या वर्षी स्विस ओपनमध्ये जेतेपद पटकावल्यानंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
कश्यपने एक तास व सहा मिनिट रंगलेल्या उपांत्य लढतीत कोरियाच्या क्वांग ही हीयोची झुंज १५-२१, २१-१५, २१-१६ ने मोडून काढली. दुसऱ्या उपांत्य लढतीत प्रणयने व्हिएतनामच्या टी.एन. मिन्ह एनगुएनचा २१-१४, २१-१९ ने सहज पराभव केला.
यंदाच्या मोसमात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंदरम्यान अंतिम लढत रंगणार आहे. एप्रिल महिन्यात श्रीकांत व बी. साई प्रणित यांनी सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यात प्रणितने प्रथमच सुपर सिरीजचे जेतेपद पटकावले होते.
मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या जोडीला कडव्या संघर्षानंतर ल्यू चिंग याओ व यांग पो हान या अव्वल मानांकित जोडीविरुद्ध १२-२१, २१-१२, २०-२२ ने पराभव स्वीकारावा लागला.
यंदाच्या मोसमातील भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंसाठी ग्रांप्री गोल्डचे हे तिसरे विजेतेपद ठरेल. यापूर्वी समीरने सैयद मोदी ग्रांप्री तर प्रणितने थायलंड ओपनचे जेतेपद पटकावले होते. भारतीय खेळाडूंनी यंदाच्या मोसमात तीन सुपर सिरिज स्पर्धांमध्ये जेतेपदाला गवसणी घातली आहे. श्रीकांतने इंडोनेशिया व आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद पटकावले तर प्रणित सिंगापूर ओपनमध्ये अजिंक्य ठरला. (वृत्तसंस्था)

अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे आनंद
विजयानंतर प्रतिक्रिया देताना कश्यप म्हणाला, ‘प्रदीर्घ कालावधीनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे आनंद झाला. कोरियन खेळाडूविरुद्धची लढत खडतर होती. त्याने चांगली सुरुवात केली आणि मला परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ लागला. तो आक्रमक स्मॅश लगावत होता. मलाही सूर गवसला आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.’

Web Title: Kashyap and Pranay will fight for the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.