पासपोर्ट न मिळाल्याने कश्यप, प्रणय व सिक्की अडचणीत
By admin | Published: July 5, 2017 01:48 AM2017-07-05T01:48:19+5:302017-07-05T01:48:19+5:30
पारुपल्ली कश्यप आणि एस.एस. प्रणय यांच्यासह आघाडीचे बॅडमिंटनपटू कॅनडा व अमेरिका येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी
नवी दिल्ली : पारुपल्ली कश्यप आणि एस.एस. प्रणय यांच्यासह आघाडीचे बॅडमिंटनपटू कॅनडा व अमेरिका येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पासपोर्टची प्रतीक्षा करीत आहेत.
राष्ट्रकुल चॅम्पियन कश्यप, प्रणय आणि दुहेरीतील स्पेशालिस्ट एन. सिक्की यांनी आठवड्यापूर्वी न्यूझीलंडच्या व्हिजासाठी अर्ज केला होता, पण अद्याप त्यांना पासपोर्टची प्रतीक्षा आहे.
कश्यपने आज टिष्ट्वटरच्या माध्यमातून विदेश मंत्री सुषमा स्वराज व क्रीडा मंत्री विजय गोयल यांना या प्रकरणावर लक्ष देण्याची विनंती केली आहे, अन्यथा कॅनडामध्ये खेळण्याची संधी गमवावी लागेल.
कश्यपने टिष्ट्वटरवर लिहिले की,‘मॅडम मी, प्रणय व सिक्की रेड्डी यांनी आठवड्यापूर्वी न्यूझीलंडकरिता व्हिजासाठी अर्ज केले आणि लवकर व्हिजा देण्याची विनंती केली. आम्हाला कॅनडा व यूएस
ओपनसाठी ६ जुलै रोजी रवाना व्हायचे आहे. त्यासाठी आम्हाला लवकर पासपोर्ट हवा आहे. त्यामुळे मॅडम या प्रकरणात आमची मदत करा, ही विनंती.’
कॅनडा ओपन ग्रांप्री स्पर्धा ११ ते १६ जुलैदरम्यान खेळल्या जाणार आहे, तर यूएस ओपन ग्रांप्री गोल्ड १९ ते २३ जुलैदरम्यान होणार आहे.