पुरुष बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी कटप्पा, विकास कृष्णा राष्ट्रीय शिबिराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:30 AM2018-12-27T05:30:09+5:302018-12-27T05:30:22+5:30
द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सीए कटप्पा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.
नवी दिल्ली : द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सीए कटप्पा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. सध्या सुरू असलेल्या राष्टÑीय शिबिरापासून त्यांची भूमिका सुरू होत असून, दुसरीकडे व्यावसायिक बॉक्सिंगसाठी सज्ज झालेला विकास कृष्ण (७५ किलो) याला मात्र तयारी शिबिरात स्थान मिळाले नाही.
विजेंदरसिंग, सुरंजयसिंग आणि शिव थापा यांच्यासह अनेक दिग्गज बॉक्सर्सना तयार करण्याचे श्रेय ३९ वर्षांचे कटप्पा यांना जाते. १० डिसेंबरपासून भारतीय बॉक्सिंग संघाचे शिबिर सुरू झाले असून, कटप्पा हे सेवानिवृत्त प्रशिक्षक एस. आर. सिंग यांचे स्थान घेतील.
निवा यांनी मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्याची तयारी आहे काय, अशी विचारणा केली होती. मी थोडा वेळ मागितला. मी फार लहान वयाचा आहे, हाच विचार डोक्यात सुरू होता. मी सँटियागो यांना यासंदर्भात सांगितले, तेव्हा त्यांनी याबाबत फारसा विचार करण्याची गरज नसल्याचे सुचविल्याचे कटप्पा यांनी सांगितले. राष्टÑीय क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण विजेते असलेले कर्नाटकचे कटप्पा यांच्यासाठी गुवाहाटी येथे होणारी इंडिया ओपन ही पहिली मोठी स्पर्धा असेल.
यंदा राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण आणि आशियाई स्पर्धेचे कांस्यपदक विजेता विकास कृष्ण याने अमेरिकेचे प्रमोटर बॉब आरुम यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या नावाचा शिबिरासाठी विचार करण्यात आला नाही. राष्टÑकुलचा पदक विजेता मनोज कुमार यालादेखील शिबिरात स्थान मिळालेले नाही. तो पुनर्वसन कार्यक्रमात व्यस्त आहे.
मनोज म्हणाला, ‘पूर्णपणे फिट होण्यास मला एक महिना लागेल. त्यानंतर चाचणीला सामोरे जावे लागेल. सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास मी नव्याने सुरू होणाऱ्या शिबिरात सहभागी होऊ शकेन.’ राष्टÑीय विजेत्या खेळाडूंसह शिबिरात सहभागी सर्वच खेळाडूंना जानेवारीत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. यातून इंडिया ओपन तसेच बल्गेरियात होणाºया स्ट्रेजा मेमोरियल स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाईल. (वृत्तसंस्था)
ही फार मोठी जबाबदारी आहे. मी मात्र सर्वोत्कृष्ट प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे काही योजना असून, या योजनांची अंमलबजावणी करू शकेन, अशी आशा आहे. ही जबाबदारी सोपविण्यास हाय परफॉर्मन्स संचालक सँटियागो नीवा यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
- सीए कटप्पा,
मुख्य प्रशिक्षक पुरुष बॉक्सिंग.