कझाकिस्तान ब्लिट्स स्पर्धेत हरिका सर्वोत्कृष्ट खेळाडू

By admin | Published: June 21, 2016 08:44 PM2016-06-21T20:44:41+5:302016-06-21T20:44:41+5:30

ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिने कझाकिस्तानच्या युरासियान बिल्ट्स बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

In the Kazakhstan blitz competition, Harika is the best player | कझाकिस्तान ब्लिट्स स्पर्धेत हरिका सर्वोत्कृष्ट खेळाडू

कझाकिस्तान ब्लिट्स स्पर्धेत हरिका सर्वोत्कृष्ट खेळाडू

Next

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २१ - ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिने कझाकिस्तानच्या युरासियान बिल्ट्स बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पूरस्कार पटकावला.
भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने २५०० डॉलर आणि ६० ईएलओ गुण मिळविले. यासोबतच ती स्पर्धेत पहिल्या १० खेळाडूंच्या यादीत सहभागी झाली. हरिकाने गेल्या अठवड्यात हंगेरीच्या जलाकारोस आतंरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवातदेखील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. यात ती क्लासिकल रँकिंगच्या यादीत नवव्या स्थानावर होती.
हरिका म्हणाली, ह्यह्यमी सलग दोन पुरस्कार स्वीकारल्याने खूप आनंदी आहे.ह्णह्ण या स्पर्धेत जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू चीनची होऊ यिफान हीदेखील सहभागी झाली होती. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व आणखी वाढते.
हरिका आणि यिफान यांनी स्पर्धेच्या अखेरीस समान १२.५ गुण मिळविले होते आणि तिने टायब्रेकरमध्ये विजय मिळविला.
हरिका म्हणाली, ह्यह्यमाझ्यासाठी ही खूप चांगली संधी होती. त्या ठिकाणी अग्रमानांकित खेळाडू सहभागी झाले होते; त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. माझी पहिली लढत बोरिस गेलफेंडविरूध्द होती. भलेही मी पराभूत झाले; मात्र एका वेळी चांगल्या स्थितीत होते. यामुळे उर्वरित स्पर्धेत माझा आत्मविश्वास वाढला.ह्णह्ण हरिकाने रुसी ग्रॅण्डमास्टर बोरिस सेवचेंकोला देखील पराभूत केले.

Web Title: In the Kazakhstan blitz competition, Harika is the best player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.