केर्बर बनली ‘यूएस’ क्विन

By admin | Published: September 12, 2016 12:53 AM2016-09-12T00:53:57+5:302016-09-12T00:53:57+5:30

जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने २०१६ मधील यशाची वाटचाल कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू ठरल्याचा आनंद साजरा केला.

Kerber became the 'US' queen | केर्बर बनली ‘यूएस’ क्विन

केर्बर बनली ‘यूएस’ क्विन

Next

न्यूयॉर्क : जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने २०१६ मधील यशाची वाटचाल कायम राखताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू ठरल्याचा आनंद साजरा केला.
यंदा वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकाविणाऱ्या दुसऱ्या मानांकित कर्बरने अंतिम लढतीत १०वे मानांकनप्राप्त झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना पिलिस्कोव्हाची झुंज ६-३, ४-६, ६-४ ने मोडून काढली.
पिलिस्कोव्हा वेगवान सर्व्हिस व भेदक फटक्यांसाठी ओळखली जाते. तिने केर्बरला घाम गाळण्यास भाग पाडले, पण ४७ टाळण्याजोग्या केलेल्या चुका निकालातील अंतर स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. पिलिस्कोव्हाने ४० विनर्स लगावले; पण तिच्या चुका वरचढ ठरल्या. निर्णायक सेटमध्ये पिलिस्कोव्हाचा फोरहँडचा फटका कोर्टबाहेर पडल्यानंतर कर्बरचा विजय निश्चित झाला. विजयानंतर केर्बरने आनंद व्यक्त केला. केर्बरने प्रशिक्षक टोर्बेन बेल्ज बसलेल्या बॉक्समध्ये धाव घेतली. त्यानंतर मैदानावर परतली व आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
केर्बरने प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभवाचा लाभ घेतला. बेसलाईनवर तिने चांगला खेळ केला. पहिल्या सेटमध्ये पिलिस्कोव्हाने दुहेरी चूक केल्यामुळे कर्बरला सेट पॉर्इंट मिळाला. केर्बरने फोरहँडच्या फटक्यावर गुण वसूल करीत ४४ मिनिटांमध्ये हा सेट जिंंकला.
पिलिस्कोव्हाने त्यानंतर भेदक सर्व्हिस व आक्रमक फटक्यांच्या जोरावर दुसऱ्या सेटमध्ये केर्बरवर वर्चस्व गाजविले. पिलिस्कोव्हाने पहिला ब्रेक पॉर्इंट घेत ४-३ अशी आघाडी घेतली. तीन गेमनंतर सेट पॉर्इंटसाठी सर्व्हिस करताना पिलिस्कोव्हाने सामन्यातील चौथ्या एसची नोंद केली व त्यानंतर आक्रमक फटका खेळत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मात्र पिलिस्कोव्हाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
पिलिस्कोव्हाला यापूर्वी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. यावेळी अंतिम फेरी गाठताना पिलिस्कोव्हाने व्हीनस व त्यानंतर सेरेना विलियम्सचा पराभव केला. एका ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत विलियम्स भगिनींचा पराभव करणारी केर्बर चौथी खेळाडू ठरली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Kerber became the 'US' queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.