‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राची ‘सुवर्ण’मुद्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:31 AM2019-01-21T06:31:39+5:302019-01-21T06:31:48+5:30

दुसऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. रविवारी संपलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत ८५ सुवर्णांसह एकूण २२७ पदकांची लयलूट केली.

Khelo India 2019 : Total No Of Medals | ‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राची ‘सुवर्ण’मुद्रा!

‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राची ‘सुवर्ण’मुद्रा!

Next

पुणे : दुसऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. रविवारी संपलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत ८५ सुवर्णांसह एकूण २२७ पदकांची लयलूट केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेचा समारोप झाला. गतवर्षी १७ वर्षांखालील गटासाठी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत हरियाणाने ३८ सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले होते. त्यांच्यापेक्षा २ सुवर्ण कमी मिळाल्याने महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा १७, तसेच २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने हरियाणापेक्षा तब्बल २३ सुवर्ण पदके जास्त जिंकून वर्चस्व ठळकपणे अधोरेखित केले. ६२ सुवर्णांसह १७८ पदके जिंकणाºया हरियाणाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ४८ सुवर्णांसह १३६ पदके जिंकणाºया दिल्ली संघाला तिसरे स्थान मिळाले.
>अर्धे सुवर्ण केवळ तीन प्रकारांनी कमावले
जलतरण (१८), जिम्नॅस्टिक (१४) आणि अ‍ॅथलेटिक्स (१३) या ३ प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिगरबाज कामगिरी करताना तब्ब्बल ४५ सुवर्णपदके जिंकली. मुष्टियुद्धातही आपला ठसा उमटवताना यजमान संघाच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण पदकांवर नाव कोरले.

Web Title: Khelo India 2019 : Total No Of Medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.