खेलो इंडिया : अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय व पूर्वाची सोनेरी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:43 PM2020-01-12T22:43:25+5:302020-01-12T22:48:27+5:30

आकाशला रौप्य तर कीर्तीला ब्रॉंझ पदक

Khelo India: abhay and purva won gold medal in Athletics for Maharastra | खेलो इंडिया : अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय व पूर्वाची सोनेरी झेप

खेलो इंडिया : अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय व पूर्वाची सोनेरी झेप

Next

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अभय गुरव व पूर्वा सावंत यांनी अनुक्रमे उंच उडी (२१ वर्षाखालील मुले) व तिहेरी उडी (१७ वषार्खालील मुली) या प्रकारात सोनेरी झेप घेत शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या आकाश सिंग याने १७ वर्षाखालील मुलांमध्ये १०० मीटर्स धावण्यात रौप्यपदक मिळविले तर कीर्ति भोईटे हिने २१ वषार्खालील मुलींमध्ये १०० मीटर्स धावण्यात ब्राँझपदक पटकाविले.

अभयने उंच उडीत २.०७ मीटर्स अशी कामगिरी करीत स्पर्धाविक्रमाची बरोबरी केली. गतवर्षी हरयाणाच्या गुरजितसिंगने पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. अभयने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. गतवर्षी त्याला दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. तो मूळचा चोपडा येथील रहिवासी असून सध्या तो नंदुरबार येथे मयूर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याला कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले होते.



हे सुवर्णपदक पालकांना अर्पण-अभय


सुवर्णपदक मिळाल्यानंतर अभयने सांगितले, राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न साकार झाले, त्याचे श्रेय माझी आत्या शीलाबाई हिला मी अर्पण करतो. माझ्या आईचे २००१ मध्ये निधन झाले. त्या धक्क््याने गेली १९ वर्षे माझे वडील आजारी आहेत. माझी आत्याच माझा सांभाळ करते. आईच्या निधनानंतर काही वर्षे मी चंद्रकांत अण्णा बालकाश्रमात लहानाचा मोठा झालो. आता मी नंदुरबार येथील यशवंत महाविद्याालयात शिकत आहे. माझे प्रशिक्षक मयूर ठाकरे हेच मला आर्थिक सहकार्य करीत आहेत.

विजेतेपदाची खात्री होती-पूर्वा
शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे मला येथे सुवर्णपदकाची खात्री होती. येथे पहिल्याच प्रयत्नात मी ११.८९ मीटर्सपर्यंत उडी मारली. तथापि येथील बोचºया वाºयामुळे मला १२ मीटर्सपेक्षा जास्त कामगिरी करता आली नाही. माझ्या यशाचे श्रेय माज्या पालकांना देते. मुंबई येथे वीरेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव करीत आहे. मसा सोमय्या महाविद्याालयाकडून भरपूर प्रोत्साहन मिळते असे पूर्वा सावंत हिने सांगितले.



आकाश सिंगने १७ वषार्खालील गटात १०० मीटर्स धावण्याची शर्यत ११.०८ सेकंदात पार केले व स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. यापूर्वी ११.१४ सेकंद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचे या स्पर्धेतील हे पहिलेच पदक असून त्याला मुंबई येथे एस.के.शेट्टी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. तो मूळचा चंडीगढचा रहिवासी असून अ‍ॅॅथलेटिक्समध्ये करिअर करण्यासाठी तो मुंबईत शिकावयास आला आहे. तो ठाकूर महाविद्याालयात शिकत आहे.


ठाकूर महाविद्याालयाची आणखी एक खेळाडू कीर्ति हिला १०० मीटर्स अंतर पार करण्यास १२.३८ सेकंद वेळ लागला. तिने विद्याापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये २०० मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळविले होते. तिला नरेश कोदुरी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Web Title: Khelo India: abhay and purva won gold medal in Athletics for Maharastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.