खेलो इंडिया : खो-खो, जलतरणात महाराष्ट्राचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 03:24 AM2020-01-20T03:24:28+5:302020-01-20T03:24:55+5:30
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने खो-खो व जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाजवले.
गुवाहाटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने खो-खो व जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. खो-खो मध्ये महाराष्ट्राने १७ वर्षाखलील मुले व मुली या दोन्ही गटांमध्येही अजिंक्यपद पटकावले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणात सुवर्णपदकांची लयलूट कायम राखली. अपेक्षा फर्नांडिसने मिडले प्रकारात तर मिहिर आम्ब्रे याने दोन तर रिले मध्ये एक अशी चार सुवर्णपदके पटकावली.
१७ वषार्खालील मुलांमध्ये खो-खोमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १९-११ असा सहज पराभव केला. मुलींच्या १७ वषाखार्लील गटाच्या अंतिम सामन्यात दिल्ली संघाला महाराष्टÑाने १४-८ असे निष्प्रभ केले. जलतणारत अपेक्षा फर्नाडिसने १७ वषार्खालील गटात ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यत ५ मिनिटे १२.१९ सेकंद अशा विक्रमी वेळेत पार केली.
मुलांच्या २१ वषार्खालील गटात मिहिर आम्ब्रे याने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५४.९१ सेकंदांमध्ये जिंकली.
महाराष्टÑाने ४ बाय १०० मीटर्स मिडले रिलेमध्येही विजेतेपद मिळवले. महाराष्टÑाच्या संघात मिहिर आम्ब्रे, सुचित पाटील, रुद्राक्ष मिश्रा व एरॉन फर्नाडिस यांचा समावेश होता. बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राने मुलींच्या २१ वषाखार्लील गटात अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राने प्रथमच या स्पधेर्तील अंतिम फेरी गाठली.
प्राजक्ता, किरण, अभिषेकला सुवर्ण
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. मुलांच्या ७३ किलो गटांत महाराष्ट्राच्या अभिषेक निपणे याने सोनेरी कामगिरी केली. गणेश बायकर याला याच गटात कास्यपदक मिळाले. युवा विभागाच्या ७३ किलो गटात महाराष्ट्राचा किरण मराठे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.