खेलो इंडिया : जलतरणात महाराष्ट्राचा सुवर्णजल्लोष कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:50 PM2020-01-21T22:50:54+5:302020-01-21T22:51:04+5:30

वेटलिफ्टिंग, टेनिसमध्ये पदकांची कमाई

Khelo India: Maharashtra retains gold in swimming | खेलो इंडिया : जलतरणात महाराष्ट्राचा सुवर्णजल्लोष कायम

खेलो इंडिया : जलतरणात महाराष्ट्राचा सुवर्णजल्लोष कायम

Next

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरणात सुवर्णजल्लोष कायम ठेवला. त्यामध्ये अपेक्षा फर्नान्डीस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. अपेक्षाने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यत २ मिनिटे २१.५२ सेकंदांत जिंकली.

पाठोपाठ तिने ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ३४.५६ सेकंदांत जिंकली. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या करिना शांता (३५.११ सेकंद) व झारा जब्बार (३५.४२ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदकाची कमाई करीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. केनिशा गुप्ता या महाराष्ट्राच्याच खेळाडूने याच वयोगटात ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिने हे अंतर २७.२९ सेकंदांत पूर्ण केली. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या साध्वी धुरीने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक (२७.९१ सेकंद) पटकाविले.

    मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिर आम्ब्रे याने आपल्या नावावर आणखी एका सुवर्णपदकाची नोंद करताना ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली. त्याने हे अंतर २३.६१ सेकंदांत पार केले. त्याचा सहकारी रुद्राक्ष मिश्रा याने हे अंतर २४.३६ सेकंदांत पूर्ण करीच ब्राँझपदक पटकाविले. याच वयोगटात महाराष्ट्राच्या अवधूत परुळेकर याने २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत ब्राँझपदक (२ मिनिटे १५.६८ सेकंद) मिळविले. २१ वर्षाखालील गटातच महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याला १५०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीचे रौप्यपदक मिळाले. त्याने हे अंतर १७ मिनिटे ०.७१ सेकंदांत पार केले.

    मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. रुद्राक्ष मिश्रा, मिहिर आम्ब्रे, सुचित पाटील व एरॉन फर्नान्डिस यांचा समावेश असलेल्या या संघाने ही शर्यत ३ मिनिटे ३५.२१ सेकंदांत पार केली. १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राला ४ बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे अंतर ३ मिनिटे ४३ सेकंदांमध्ये पार केले.

*वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवीचा सुवर्णवेध
    महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाºया सातारा येथील वैष्णवी पवार हिने युवा ८१ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ६२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ७२ किलो असे एकूण १३४ किलो वजन उचलले. यापूर्वी तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळविले असून तिला जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. कनिष्ठ मुलींच्या ८१ किलो गटात मयुरी देवरे हिने रौप्यपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ७६ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १०५ किलो असे एकूण १८१ किलो वजन उचलले. तिचीच सहकारी रुचिका ढोरे हिला ब्राँझपदक मिळाले. तिने . तिने स्नॅचमध्ये ६५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८० किलो असे एकूण १४५ किलो वजन उचलले.

*टेनिसमध्ये ध्रुव व अथर्वला ब्राँझ
    महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश व अथर्व शर्मा यांनी २१ वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत ब्राँझपदक पटकाविले. त्यांनी हे पदक मिळविताना हरयाणाच्या आकाश अहलावत व अमित बेनिवाल यांचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडविला. ध्रुवने या गटातील एकेरीत यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत त्याची तामिळनाडूच्या डी.सुरेश याचाशी गाठ पडणार आहे. मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा निटुरेची कर्नाटकच्या रेश्मा मरुरी हिच्याशी लढत होईल. मुलींच्या २१ वषार्खालील दुहेरीत महाराष्ट्राच्या स्नेहल माने व मिहिका यादव यांची अंतिम फेरीत सी.श्राव्या व सामा सात्विका (तेलंगणा) यांच्याशी गाठ पडणार आहे.

Web Title: Khelo India: Maharashtra retains gold in swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.