खो-खो : अमर हिंद मंडळाचा फक्त एका गुणाने पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 09:09 PM2019-02-26T21:09:27+5:302019-02-26T21:10:02+5:30
नरसिंहच्या निकिता वाघ हिने २:५०, १:०० मिनिटे संरक्षण करताना तीन बळी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली.
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिअशनच्या मान्यतेने व शिवनेरी सेवा मंडळ यांची पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कै मोहन नाईक सुवर्ण चषक खो खो स्पर्धेत आज झालेल्या महिला राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याच्या नरसिंह क्रीडा मंडळ या संघाने अमर हिंद मंडळ दादरच्या संघाचा (०४-०९-०५-०१) १०-०९ असा ७:०० मिनिटे राखून एक गुणाने पराभव केला. नरसिंहच्या निकिता वाघ हिने २:५०, १:०० मिनिटे संरक्षण करताना तीन बळी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली. तेजल जाधव हिने २:१० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन बळी मिळवले, तर सपना जाधव हिने ३:१०, ०:५० मिनिटे नाबाद संरक्षण केले तर अमरहिंदच्या मधुरा पेडणेकर हिने ३:१० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन बळी मिळवले, संजना कुडव याने १:४० मिनिटे संरक्षण करताना दोन बळी मिळवले तर प्रीती सुर्वे हिने आक्रमणात तीन बळी मिळवले मात्र त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.
आज झालेल्या महिला राज्यस्तरीय स्पर्धेत परांजपे स्पोर्ट्स क्लब या संघाने यजमान शिवनेरी सेवा मंडळ दादरच्या संघाचा (१०-०३-०३) १०-०६ असा असा एक डाव व चार गुणाने पराभव केला. परांजपेच्या आरती कदम हिने ३:१०, ३:२० मिनिटे संरक्षण करताना सहा बळी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली. रचना जुवळे हिने २:१०, २:४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन बळी मिळवले, तर श्रुती कदम हिने २:०० मिनिटे नाबाद संरक्षण केले व एक बळी मिळवला तर शिवनेरीच्या अक्षया गावडे हिने २:१० व २:०० मिनिटे संरक्षण केले तर शिवानी गुप्ता याने १:४० मिनिटे संरक्षण करताना तीन बळी मिळवले व चांगली लढत दिली.
आज झालेल्या पहिल्या व्यावसायिक स्पर्धेत विद्युत महावितरण कंपनी या संघाने सर्वेश्वर डेअरी या संघाचा (७-०३-०३) ०७-०६ असा एक डाव व एका गुणाने पराभव केला. महावितरणच्या संघातर्फे नरेश सावंत याने १:५०, २:३० मिनिटे नाबाद संरक्षण केले तर निखिल वाघे याने २:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन बळी मिळवले, तर विराज कोठमकर याने १:४० मिनिटे नाबाद संरक्षण केले आक्रमणात एक बळी मिळवला. तर सर्वेश्वर डेअरी तर्फे शैलेश मर्गच याने १:२० मिनिटे संरक्षण करताना एक बळी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली तर विजय भोईर याने १:२० संरक्षण केले व चांगली लढत दिली.