मुंबई शहर व उपनगरची विजयी सलामी राज्य खो - खो : एकतर्फी सामन्यात दबदबा

By Admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:29+5:302015-10-03T00:20:29+5:30

मुंबई : जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या ४३व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेच्या कुमार गटात मुंबई शहर व उपनगर या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली.

Kho-Kho: One-way victory in Mumbai and suburbs | मुंबई शहर व उपनगरची विजयी सलामी राज्य खो - खो : एकतर्फी सामन्यात दबदबा

मुंबई शहर व उपनगरची विजयी सलामी राज्य खो - खो : एकतर्फी सामन्यात दबदबा

googlenewsNext
ंबई : जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या ४३व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेच्या कुमार गटात मुंबई शहर व उपनगर या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली.
महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या वतीने आणि जळगाव जिल्हा खो-खो संघटनेच्या यजमानपदाखाली सुरु असलेल्या या स्पर्धेत मुंबई शहरने एकतर्फी सामन्यात पालघर संघाचा १६-७ असा एक डाव व ८ गुणांनी फडशा पाडला. पहिल्याच डावामध्ये १६-३ अशी मजबूत आघाडी घेऊन मुंबईकरांनी सामन्याचे चित्र स्पष्ट केले. विक्रम तांबे आणि प्रफुल्ल तांबे यांचा दमदार अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला. तसेच विराज पाष्टेचे संरक्षण आणि निखिल कांबळे व यश चव्हाण यांच्या जबरदस्त आक्रमणापुढे पालघरचा निभाव लागला नाही.
दुसर्‍या बाजूला गतविजेत्या मुंबई उपनगरने अपेक्षित कामगिरी करताना बीड संघाला १५-८ असे एक डाव व ७ गुणांनी लोळवले. मध्यंतरालाच उपनगरने १५-३ अशी एकतर्फी आघाडी घेत बीडच्या आव्हानातली हवा काढली. ॠषिकेश मुर्चावडेचा अप्रतिम अष्टपैलू खेळ बीड संघावर डोकेदुखी ठरला. तसेच दुर्वेश साळुंखेने केलेले ५ मिनिटांचे दमदार संरक्षणाने बीडची चांगलीच दमछाक झाली. याव्यतिरीक्त प्रतीक देवरे, अजित वाचिम आणि प्रवीण कुदळे यांचे आक्रमण मुंबई उपनगरच्या विजयात निर्णायक ठरले. (क्रीडा प्रतिनिधी)
......................................

फोटो :
कुमार गटातील एका सामन्यात रंगलेला चुरशीचा क्षण.

Web Title: Kho-Kho: One-way victory in Mumbai and suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.