आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश होण्याचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:05 AM2020-03-17T04:05:52+5:302020-03-17T04:06:13+5:30

जकार्था येथे २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान आशियाई आॅलिम्पिक परिषदेने खो-खोला औपचारिक मान्यता दिली होती

Kho-Kho's belief in Asian competition | आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश होण्याचा विश्वास

आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश होण्याचा विश्वास

Next

नवी दिल्ली : ‘जपानमध्ये २०२६ साली होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो खेळाचा समावेश होण्याची आम्हाला आशा आहे,’ अशी प्रतिक्रीया भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली. जगभरामध्ये २५ देशांत खो-खो खेळ खेळला जातो.
मेहता म्हणाले की, ‘जकार्था येथे २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान आशियाई आॅलिम्पिक परिषदेने खो-खोला औपचारिक मान्यता दिली होती. त्यामुळेच आम्हाला आशा आहे की, या खेळाला २०२६ सालापर्यंत परिपूर्ण खेळाचा दर्जा मिळेल.’

Web Title: Kho-Kho's belief in Asian competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो