नोकरीच्या मार्गात क्रीडा खात्याचा खोडा, सुधा सिंग झिजवतेय सरकारी उंबरठा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 06:44 AM2018-10-04T06:44:02+5:302018-10-04T06:44:26+5:30

धावपटू सुधासिंगचा आरोप : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रशासकीय यंत्रणा ढिम्म

Khuda Khuda of the department of employment, Sudha Singh is a government official | नोकरीच्या मार्गात क्रीडा खात्याचा खोडा, सुधा सिंग झिजवतेय सरकारी उंबरठा

नोकरीच्या मार्गात क्रीडा खात्याचा खोडा, सुधा सिंग झिजवतेय सरकारी उंबरठा

Next

लखनऊ : स्टीपलचेसची आशियाई रौप्य पदक विजेती सुधा सिंग नोकरीसाठी शासकीय उंबरठे झिजवत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आश्वासनानंतरही सरकारच्या क्रीडा खात्याने या खेळाडूच्या नोकरीचा मार्ग रोखून धरला आहे. सुधाने मंगळवारी राष्टत्तमकुल आणि जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या गौरव सहोळ्यात पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तिची समजूत काढली होती. सलग तीन पदके जिंकणाऱ्या सुधाने क्रीडा खाते मला नोकरी देण्यात आडकाठी ठरत असल्याचा आरोप केला. क्रीडा खात्यात उपसंचालक पदासाठी सुधा पात्र नसल्याचे सानगून नियम पुढे करण्यात येत असल्याने ही आंतरराष्ट्रीय खेळाडू हताश झाली.

सुधाने पुरस्कार सोहळ्यात सन्मान स्वीकारण्यास नकार देत, एमला रक्कम नको, उपसंचालकाची नोकरी हवी, अशी मागणी केली. यावर राज्यपाल राम नाईक यांनीही आश्वासन देत सुधाला पुरस्कार स्विकारण्यास बाध्य केले होते. २०१०च्या ग्वांझू आशियाडचे सुवर्ण विजेत्या सुधाने उपसंचालकपदाची मागणी केली होती. त्यामागे तिने अनेक उदाहरणे दिली. क्रीडा खात्यात आपला समावेश होऊ नये यासाठी , यासाठी एक लॉबी सक्रिय असून या आधी खेळाडूंना हे पद दिल्याचा सुधाचा युक्तीवाद आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीच्या सुधाला आशियाई पदक जिंकताच मुख्यमंत्र्यांनी राजपत्रित अधिकारी पदी नोकरी देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी सुधाने नोकरीसाठी २०१४ पासून फाईल शासन दरबारी असल्याचे सांगितले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री चेतन चौहान म्हणाले, ‘सुधाला क्रीडा विभागात सामावून घेण्यास कुठलीही अडचण नाही. पण तिला क्रीडा उपसंचालकपद हवे आहे. या पदावर सरकार थेट नियुक्ती देऊ शकत नाही. उपसंचालकाचे पद राज्य लोकसेवा अयोगाकडून भरले जाते. थेट नियुक्तीचा अधिकार सरकारला नाही. सुधाला आधी क्रीडा अधिकारी पद स्वीकारावे लागेल. त्यानंतर पदोन्नतीच्या माध्यमातून ती क्रीडा उपसंचालकपदापर्यंत पोहोचू शकते.

उपसंचालकपद मागितल्याबद्दल मी माफी मागते. मला क्षेत्रीय क्रीडा अधिकारी तरी बनवा. योगी आदित्यनाथ यांनी मागे मला पोलीस उपअधीक्षकपदाची आॅफर दिलीपण मी क्रीडा उपसंचालक पदाचा हट्ट धरला व त्यांनी होकारही दिला होता. त्यानंतरही क्रीडा विभाग नियमावर बोट ठेवून चक्क नकार देत आहे.
- सुधा सिंग />
आशियाई क्रीडा स्पर्धेत
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य विजेती सुधा दोनदा आलिम्पिक, दोनदा विश्व चॅम्पियनशिप आणि चारवेळा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली. केंद्र शासनाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. ती उपसंचालक पदाच्या नोकरीची हकदार आहे.

Web Title: Khuda Khuda of the department of employment, Sudha Singh is a government official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.