किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
By Admin | Published: August 17, 2016 07:08 PM2016-08-17T19:08:45+5:302016-08-17T19:09:02+5:30
किदांबी श्रीकांतचा तीन सेटमध्ये २-१ने पराभव झाला. चीनच्या लिन डानने दबावात आपला खेळ उंचावत ६-२१, २१-११ आणि १८-२१ असा विजय नोंदवला.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १७ : बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात किदांबी श्रीकांतला पराभवला समारं जाव लागल्यामुळे ऑलिम्पिक मधील आव्हान संपुष्टात आले आहे. किदांबी श्रीकांतचा तीन सेटमध्ये २-१ने पराभव झाला. चीनच्या लिन डानने दबावात आपला खेळ उंचावत ६-२१, २१-११ आणि १८-२१ असा विजय नोंदवला. या पराभवामुळे भारताची पदकाची आशा संपुष्टात आली आहे.
उपांत्यपुर्व सामन्यात पहिल्या सेटमध्ये किदांबी श्रीकांतने पहिला सेट ६-२१ अशा फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये २१-११ असे पुनराग्मन केले होते. तिसऱ्या आणि निर्णयाक सेटमध्ये श्रीकांतने पहिल्यापासून आक्रमक खेळाचे प्रदर्षन केले मात्र तिसऱ्या सेटच्या अंतिम टप्प्यात त्याला दबावात आपला खेळ उंचावता आला नाही. आणि पराभवला सामोरं जाव लागलं.
उपउपांत्यपुर्व सपर्धेतील सामन्यात किदांबी श्रीकांतनं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जैन ओ जॉरगेंसेनवर सरळ सेटमध्ये 21-19, 21-19 अशी मात करत उपांत्यसामन्यात प्रवेश केला होता.
(बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक)