श्रीनिवासन प्रकरणावरून कीर्ती आझाद बीसीसीआयवर नाराज
By admin | Published: November 28, 2014 01:29 AM2014-11-28T01:29:06+5:302014-11-28T01:29:06+5:30
एन. श्रीनिवासन यांच्याबाबतच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर माजी क्रिकेटपटू व भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली.
Next
नवी दिल्ली : एन. श्रीनिवासन यांच्याबाबतच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर माजी क्रिकेटपटू व भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली. आयपीएल संचालन परिषदेच्या ‘चुप्पी’ साधण्याबाबतही आझाद यांनी प्रश्न उपस्थित केला.
आझाद म्हणाले,‘हा एक मुद्दा केवळ हिमनगाचे एक टोक आहे. संचालन परिषदेमध्ये अनेक लोकांचा स्वार्थ जुळलेला आहे.’
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेन्ट्समधील त्यांच्या भागीदारीचा अहवाल आणि कार्यकारी बोर्डाच्या सदस्यांची माहिती मागितली आहे. त्याचप्रमाणो कंपनीच्या मालिकीच्या चेन्नई सुपरकिंग्जवर कुणाचे नियंत्रण आहे, याची माहिती न्यायालयाने मागितली आहे. न्यायालयाने बीसीसीआयची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव दिला आहे, पण मुद्गल समितीच्या अहवालामध्ये नाव असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढण्यास मनाई केली आहे. न्यायालयाच्या मते आयपीएलच्या सहाव्या पर्वातील घोटाळ्याबाबत निर्णय बीसीसीआयची नवी कार्यकारिणी घेईल.
मॅच फिक्सिंगच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या मुद्गल समितीच्या अहवालामध्ये श्रीनिवासनचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्या नावाचा उल्लेख आहे.
आझाद म्हणाले,‘बीसीसीआय आणि आयपीएल कायद्यापेक्षा वरचढ आहे. कारण संचालन परिषदेमध्ये समावेश असलेल्या व्यक्ती उच्चपदस्थ आहेत. (वृत्तसंस्था)
त्यांचा विविध राजकीय पक्षांसोबत संबंध आहे. त्यांच्यापैकी अनेक व्यक्तींचा परिषदेमध्ये समावेश आहे. ही एक केवळ झलक असून ज्यावेळी घटना घडत होती त्यावेळी संचालन परिषदेने आपले डोळे का बंद केले होते.’