किवी एक्स्प्रेस सुसाट

By admin | Published: March 19, 2016 02:02 AM2016-03-19T02:02:56+5:302016-03-19T02:02:56+5:30

न्यूझीलंडने शुक्रवारी खेळेलेल्या लढतीत आंतर टास्मानिया प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव केला आणि टी-२० विश्वकप स्पर्धेत प्रबळ दावेदारांमध्ये स्थान मिळविले.

Kiwi Express SuSAT | किवी एक्स्प्रेस सुसाट

किवी एक्स्प्रेस सुसाट

Next

धरमशाला : न्यूझीलंडने शुक्रवारी खेळेलेल्या लढतीत आंतर टास्मानिया प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव केला आणि टी-२० विश्वकप स्पर्धेत प्रबळ दावेदारांमध्ये स्थान मिळविले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना न्यूझीलंडने २० षटकांत ८ बाद १४२ धावांची मजल मारली. आॅस्ट्रेलियाचा डाव ९ बाद १३४ धावांत रोखला गेला. आॅस्ट्रेलियाला सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला, तर पहिल्या लढतीत यजमान व प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला ४७ धावांनी पराभूत करणाऱ्या किवी संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला.
न्यूझीलंडतर्फे सलामीवीर मार्टिन गुप्तीलने आक्रमक खेळी करताना २७ चेंडूंमध्ये दोन चौकार व चार षट्कारांच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. कर्णधार केन विलियम्सनने २० चेंडूंमध्ये २४ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सलामीला ६१ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियातर्फे जेम्स फॉकनेर व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी तीन षटकांत प्रत्येकी १८ धावा बहाल करताना प्रत्येकी दोन बळी घेतले.
आॅस्ट्रेलिया संघाने सहाव्या षटकात मिशेल मॅक्लीनागनने अनुभवी शेन वॉटसनला माघारी परविले. त्यावेळी धावसंख्या ४४ होती. त्यानंतर सात धावांची भर पडली असता कर्णधार स्टीव्हन स्मिथ (६) बाद झाला. डेव्हिड वॉर्नर (६) सॅन्टरनचा दुसरा बळी ठरला. आॅस्ट्रेलियातर्फे सलामीवीर उस्मान ख्वाजाचा (३८ धावा, २७ चेंडू, ६ चौकार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. (वृत्तसंस्था)

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल झे. मॅक्सवेल गो. फॉकनर ३९, केन विलियम्सन झे. एगर गो. मॅक्सवेल २४, कोलिन मुन्रो झे. फॉकनर गो. मार्श २३, कोरी अ‍ॅन्डरसन झे. एगर गो. मॅक्सवेल ०३, रॉस टेलर झे. मार्श गो. वॉटसन ११, ग्रॅन्टा इलियट धावबाद २७, ल्युक रोंची झे. मॅक्सवेल गो. फॉकनर ०६, मिशेल सॅन्टनर धावबाद ०१, अ‍ॅडम मिलने नाबाद ०२. अवांतर (६). एकूण २० षटकांत ८ बाद १४२. बाद क्रम : १-६१, २-६६, ३-७६, ४-९७, ५-११७, ६-१३३, ७-१४०, ८-१४२. गोलंदाजी : कोल्टर नील ४-०-३३-०, वॉटसन ४-०-२२-१, एगर १-०-१८-०, फॉकनर ३-०-१८-२, जाम्पा १-०-३-०, मॅक्सवेल ३-०-१८-२, मार्श ४-०-२६-१.

आॅस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा धावबाद ३८, शेन वॉटसन झे. विलियम्सन गो. मॅक्लीनागन १३, स्टीव्हन स्मिथ यष्टिचित रोंची गो. सॅन्टनर ०६, डेव्हिड वॉर्नर झे. गुप्तिल गो. सॅन्टनर ०६, ग्लेन मॅक्सवेल झे. विलियम्सन गो. सोढी २२, मिशेल मार्श झे. मिलने गो. मॅक्लीनागन २४, एश्टन एगर झे. टेलर गो. मॅक्लीनागन ०९, जेम्स फॉकनर झे. गुप्तिल गो. अ‍ॅन्डरसन ०२, नॅथन कोल्टर नील गो. अ‍ॅन्डरसन ०१, पीटर नेव्हिल नाबाद ०७, अ‍ॅडम जम्पा नाबाद ०२. अवांतर (०४). एकूण २० षटकांत ९ बाद १३४. बाद क्रम : १-४४, २-५१, ३-६२, ४-६६, ५-१००, ६-१२१, ७-१२३, ८-१२४, ९-१३२. गोलंदाजी : अ‍ॅन्डरसन ४-०-२९-२, मिलने २-०-२२-०, इलियट २-०-१७-०, मॅक्लीनागन ३-०-१७-३, सॅन्टनर ४-०-३०-२, विलियम्सन १-०-३-०, सोढी ४-०-१४-१.

Web Title: Kiwi Express SuSAT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.