केकेआरची प्लेआॅफमध्ये धडक
By admin | Published: May 23, 2016 01:18 AM2016-05-23T01:18:41+5:302016-05-23T01:18:41+5:30
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा २२ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात दिमाखात प्लेआॅफमध्ये प्रवेश निश्चित केला.
कोलकाता : युसूफ पठाण व मनीष पांडे यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर सुनील नारायणच्या नेतृत्वाखाली फिरकीपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने (केकेआर) रविवारी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा २२ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात दिमाखात प्लेआॅफमध्ये प्रवेश निश्चित केला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआर संघाची एकवेळ ३ बाद ५७ अशी अवस्था होती. त्यानंतर युसूफ पठाण (५२ धावा, ३४ चेंडू) आणि मनीष पांडे (४८ धावा, ३० चेंडू) यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. एकवेळ केकेआर संघ दोनशेच्या आसपास मजल मारण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते; पण सनरायझर्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत अचूक मारा करीत केवळ ३० धावा बहाल केल्या. त्यामुळे सनरायझर्स संघ केकेआरला ६ बाद १७१ धावांत रोखण्यात यशस्वी ठरला. फिरकीपटूंना अनुकूल या खेळपट्टीवर सनरायझर्स संघासाठी ही विशाल धावसंख्या ठरली.
संक्षिप्त धावफलक
४कोलकाता नाईटरायडर्स : रॉबिन उथप्पा झे. विलियम्सन गो. सरण २५, गौतम गंभीर झे. हेन्रिक्स गो. हुड्डा १६, मनीष पांडे झे. विलियम्सन गो. भुवनेश्वर ४८, युसूफ पठाण नाबाद ५२. एकूण २० षटकांत ६ बाद १७१. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३१-२, बरिंदर सरण ४-०-३१-१, हुडा २-०-१६-२, मुस्तफिजुर रहमान ४-०-३२-१.
४सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन झे. मुन्रो गो. कुलदीप यादव ५१, डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. नारायण १८, नमन ओझा झे. उथप्पा गो. नारायण १५, युवराज सिंग झे. सतीश गो. शाकिब १९. एकूण २० षटकांत ८ बाद १४९. गोलंदाजी : राजपूत २-०-२१-१, शाकिब ४-०-३४-१, नारायण ४-०-२६-३, कुलदीप यादव ४-०-२८-२.