केकेआर, पुणे संघांच्या लढवय्या वृत्तीला सलाम

By Admin | Published: April 26, 2017 01:14 AM2017-04-26T01:14:38+5:302017-04-26T01:14:38+5:30

लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवणे सोपे असते, हे जाणकारांचे मत आयपीएलमध्ये दोन संघांनी चुकीचे ठरविले आहे. त्यात एक संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स.

KKR, Pune's warrior attitude to the team | केकेआर, पुणे संघांच्या लढवय्या वृत्तीला सलाम

केकेआर, पुणे संघांच्या लढवय्या वृत्तीला सलाम

googlenewsNext

सुनील गावसकर लिहितात...
लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवणे सोपे असते, हे जाणकारांचे मत आयपीएलमध्ये दोन संघांनी चुकीचे ठरविले आहे. त्यात एक संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अनपेक्षित
विजय मिळवताना विश्वास असेल तर विपरीत परिस्थितीतही दिग्गज प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सरशी साधता येत असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर पुढच्याच दिवशी मुंबईमध्ये सुपरजायंट संघाने लढवय्या वृत्तीचा परिचय देताना मजबूत फलंदाजी असलेल्या यजमान संघाला साधारण धावसंख्येचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले.
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व सौरभ गांगुलीने सांभाळले तेव्हापासून ईडनगार्डन्सची खेळपट्टी हिरवळ असलेली दिसू लागली. त्यामुळे आपल्या वेगवान माऱ्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असलेल्या फलंदाजांना काही दाखविण्याची संधी उपलब्ध झाली. रविवारी झालेल्या तुरळक पावसानंतर चेंडू हवेमध्येच स्विंग होत होता, असे नाही तर खेळपट्टीवर पडल्यानंतर वेगाने उसळत होता. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी क्वचितच मिळते. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला परिस्थितीनुरूप फलंदाजी करता आली नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. संपूर्ण संघाने केकेआरच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकविले. या शानदार विजयामुळे केकेआरने आपली सरासरीही सुधारली.
सुपरजायंटने दिलेल्या लक्ष्याची मुंबई इंडियन्सला चिंता बाळगण्याची गरज नव्हती. मुंबई इंडियन्सची मजबूत फलंदाजी बघता या संघाने सहज विजय नोंदविणे अपेक्षित होते, घडले उलटेच. पुणे संघाच्या खेळाडूंनी मैदानावर लढवय्या बाणा दाखविताना यजमान संघापुढे कडवे आव्हान निर्माण केले. अखेर मुंबई संघाला थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. स्टोक्सने या लढतीत अखेरपर्यंत पुणे संघाचे आव्हान कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाच्या विजयासाठी सर्वकाही पणाला लावणारे स्टोक्ससारखे मोजकेच खेळाडू असतात. स्टोक्सने शानदार खेळ केला. पुणे संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने लांब दौड लगावताना धोकादायक ठरू पाहणाऱ्या पोलार्डचा झेल टिपला. यावरून या लढतीत सुपरजायंट संघ विजयासाठी सर्व काही झोकून देण्यास सज्ज असल्याचे दिसून आले. अशा संघांदरम्यानच्या लढतींमध्ये विजयासाठी संघर्ष बघण्याचा आनंद वेगळाच असतो. अशी रंगत अनुभवण्यासाठी नेहमी आतूर असतो, पण ईडनगार्डन्स व वानखेडे स्टेडियमप्रमाणे खेळपट्ट्याही नेहमी मिळणे महत्त्वाचे ठरते. (पीएमजी)

Web Title: KKR, Pune's warrior attitude to the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.