केकेआर विजयी

By admin | Published: April 16, 2017 03:45 AM2017-04-16T03:45:09+5:302017-04-16T03:45:09+5:30

रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या दहाव्या पर्वात शनिवारी खेळल्या गेलेल्या

KKR won | केकेआर विजयी

केकेआर विजयी

Next

कोलकाता : रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या दहाव्या पर्वात शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव करीत, सलग दुसरा विजय नोंदवला.
सामनावीर उथप्पाच्या (६८) अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआर संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा डाव निर्धारित २० षटकांत ६ बाद १५५ धावांत रोखला.
केकेआरने गृहमैदान ईडन गार्डनवर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजयाची मालिका कायम राखली. या मैदानावर सनरायजर्सविरुद्ध हा त्यांचा सलग पाचवा विजय ठरला. हैदराबादतर्फे कर्णधार डेव्हिड वॉर्नर व युवराज सिंग यांनी प्रत्येकी २६ धावांची खेळी केली. अन्य खेळाडूंना यापेक्षा अधिक धावा फटकावता आल्या नाही. अखेर बिपुल शर्माने १४ चेंडूंमध्ये दोन चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद २१ धावा केल्या, पण संघाचा पराभव टाळण्यात तो अपयशीच ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला मोठी भागीदारी नोंदवता आली नाही. वॉर्नर व शिखर धवन यांनी सलामीला ४६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मधल्या फळीत एकही उल्लेखनीय भागीदारी झाली नाही. युवराजने प्रयत्न केला, पण ख्रिस व्होक्सने (२-४९) त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्याने १६ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने २६ धावा फटकावल्या. केकेआरतर्फे सुनील नरेन व कुलदीप यादव यांनी चांगली गोलंदाजी केली. नारायणने १८ तर कुलदीपने २३ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी १ बळी घेतला. ट्रेंट बोल्ट व युसूफ पठाण यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. त्याआधी, उथप्पाच्या (६८ धावा, ३९ चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआरने निराशाजनक सुरुवातीनंतर ६ बाद १७२ धावांची आव्हानात्मक मजल मारली.

- प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाची सुरुवात निशाजनक झाली. पॉवर प्लेमध्ये त्यांनी ४० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाज गमावले होते. भुवनेश्वर कुमार (३-२०) व राशिद खान (१-२९) यांनी पहिल्या सहा षटकांमध्ये अनुक्रमे सुनील नरेन व गौतम गंभीर यांना तंबूचा मार्ग दाखविला. निराशाजनक सुरुवातीनंतर रॉबिन उथप्पा व मनीष पांडे यांनी ५२ चेंडूंमध्ये ७७ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. उथप्पाने ४ षटकार व ५ चौकारांचा मदतीने ६८ धावा तर पांडेने ३ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ३५ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईटरायडर्स २० षटकांत ६ बाद १७२ (रॉबिन उथप्पा ६८, मनीष पांडे ४६, युसूफ पठाण नाबाद २१; भुवनेश्वर ३-२०, नेहरा, कटिंग, राशिद खान प्रत्येकी १ बळी) पराभूत सनरायजर्स हैदराबाद २० षटकांत ६ बाद १५५ (डेव्हिड वॉर्नर २६, युवराज २६, शिखर धवन २३, बेन कटिंग १५; ख्रिस व्होक्स २-४९, युसूफ पठाण, कुलदीप यादव, ट्रेन्ट बोल्ट व सुनील नरेन प्रत्येकी १ बळी)

Web Title: KKR won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.