कोहली, धोनीत ‘आॅल इज वेल’!

By admin | Published: January 3, 2015 01:48 AM2015-01-03T01:48:03+5:302015-01-03T01:48:03+5:30

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याच्या बातम्यांचे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खंडन केले.

Kohli, Dhoni, 'All Is Well'! | कोहली, धोनीत ‘आॅल इज वेल’!

कोहली, धोनीत ‘आॅल इज वेल’!

Next

शास्त्रींची स्पष्टोक्ती : या दोघांमधील वादाचे केले खंडन

नवी दिल्ली : रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याच्या बातम्यांचे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी खंडन केले. कोहली आणि धोनी यांच्यात कोणताही वाद नसून, ‘आॅल ईज वेल’असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. या सर्व अफवा असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट
केले. नववर्षाच्या पहिल्याच
दिवशी आॅस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसह भारतीय संघाने टी-पार्टी केली. त्यानंतर शास्त्री म्हणाले, विराटसह संघाचे इतर खेळाडूच नव्हे, तर संघाचे सहायक स्टाफही धोनीचा सन्मान करतात.
कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेण्याच्या धोनीच्या निर्णयाने सर्वांना अचंबित केले. ड्रेसिंग रूममधील वादांमुळेच धोनीने ही निवृत्ती घेतल्याच्या चर्चांना उधाण आले. धोनीच्या निवृत्तीबाबत शास्त्री म्हणाले, हा निर्णय मलाही अचंबित करणारा होता; परंतु हा धाडसी निर्णय होता. माझ्या दृष्टिकोनातून धोनीने यशाची उंची गाठली आहे आणि त्याला १०० कसोटी खेळून स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. त्याला कुठल्या निरोप समारंभाचीही गरज नाही.
कोहली आणि शिखर धवन यांच्यातील वादाच्या बातम्याही निराधार असल्याचे सांगून शास्त्री म्हणाले, ही चुकीची बातमी आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये कोणताही वाद नाही. गेल्या पाच वर्षांपासून
कोहली संघाचा सदस्य आहे आणि संघातील इतर खेळाडूंना त्याच्या सोबतीची सवय आहे. संघातील अनेक खेळाडू १९ वर्षांखालील संघात एकत्र खेळले आहेत.

गोलंदाजीत सुधारणा आवश्यक
४भारतीय संघाच्या गोलंदाजांना सलग सामन्यांत २० विकेट घेण्याचे तंत्र विकसित करण्याची आवश्यकता आहे. आॅस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत दोन्ही संघांच्या गोलंदाजांमध्ये मोठे अंतर पाहायला मिळाले. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडे अनुभव असून, भारतीय गोलंदाज त्यात कमी पडतात.
४भविष्यात खूप काम करायचे आहे. सर्वांत आधी गोलंदाजी प्रभावशाली बनविण्याच्या दिशेने काम सुरू करणार असून, २० विकेट घेण्याच्या तंत्राचा विकास करण्यासाठी पावले उचलली जातील. आमच्याकडे युवा खेळाडूंची फौज आहे.

शास्त्रींकडून विराटचा बचाव
या मालिकेत फलंदाजीमुळेच नव्हे, तर मैदानावरील शाब्दिक चकमकींमुळे विराट कोहली चर्चेत राहिला. मिशेल जॉन्सनवर केलेल्या टीकेवरील प्रश्नावर शास्त्री म्हणाले, हे विराटचे व्यक्तिमत्त्व आहे. तो आक्रमक आणि रागीट आहे. वयाच्या २६व्या वर्षी तो संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारत आहे. हा एक युवा संघ असून, लवकरच प्रशंसनीय कामगिरी करेल.

आता नजर कोहलीवर
४भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तीन दिवसांनी आता पूर्ण लक्ष नवा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर केंद्रित झाले आहे. विराट ६ जानेवारीपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
४धोनी आता मैदानात व मैदानाबाहेरही दिसेनासा झाला आहे. आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी एबोट यांनी उभय संघांसाठी रविवारी आयोजित केलेल्या टी पार्टीमध्येही धोनी सहभागी झाला नव्हता. धोनीने निवृत्ती स्वीकारल्यामुळे आता तो कसोटी संघाचा सदस्य नाही, पण त्याला आमंत्रण देण्यात आले होते. त्याच्या अनुपस्थितीत कोहली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कोहलीने आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ व एबोट यांच्यासोबत छायाचित्रे काढली.
४धोनीच्या निवृत्तीपूर्वीही आॅस्ट्रेलियामध्ये कोहली चर्चेत होता. त्याने अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषविले. आॅस्ट्रेलियन खेळाडूंसोबत त्याचे अनेकदा वाद झाले.
४आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंग म्हणाला,‘विराट आक्रमक आहे. मला जर त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली असती तर मी स्लेजिंगचा आधार घेतला नसता. कारण त्याचा तो आपल्याविरुद्ध वापर करू शकतो.’
४पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके ठोकणाऱ्या कोहलीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचविले होते. फ्लेमिंगच्या मते कोहली माजी कर्णधाराच्या तुलनेत सरस ठरेल. फ्लेमिंग म्हणाला,‘धोनी मैदानावर अधिक आक्रमक भासत नव्हता. कोहली प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. कोहली सचिन तेंडुलकर व अडम गिलख्रिस्ट यांच्या तुलनेत वेगळा आहे. ते स्लेजिंगवर कधीच प्रतिक्रिया देत नव्हते. त्यांना कुणीच काही म्हणत नव्हते आणि एखाद्याने काही म्हटले तरी त्यावर
त्यांची प्रतिक्रिया मिळत नव्हती. सचिन
रागाने लालबुंद होत होता पण मैदानावर
मात्र त्याच्याकडून कधीच प्रतिक्रिया मिळत नव्हती. कोहली वेगळा असून खेळासाठी ते योग्य आहे. ’
४धोनीबाबत चर्वितचर्वण बंद झाले आहे. धोनी संघासोबत असून आॅस्ट्रेलियात थांबणार असल्याचे संकेत मिळत आहे. तिरंगी मालिकेला अद्याप १६ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

Web Title: Kohli, Dhoni, 'All Is Well'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.