कोहली, धोनी, युवी, रैना बनले ‘शंभर नंबरी’
By admin | Published: May 31, 2017 08:05 PM2017-05-31T20:05:19+5:302017-05-31T20:05:19+5:30
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, डावखुरा फलंदाज युवराजसिंग आणि सुरेश रैना हे ईएसपीएनच्या जगातील आघाडीच्या शंभर खेळाडूंमध्ये
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, डावखुरा फलंदाज युवराजसिंग आणि सुरेश रैना हे ईएसपीएनच्या जगातील आघाडीच्या शंभर खेळाडूंमध्ये स्थान पटकविण्यात यशस्वी ठरले आहेत.
सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत कोहली १३ व्या, धोनी १५ व्या, युवराज ९० व्या आणि रैना ९३ व्या स्थानावर आहे. ईएसपीएनने जगात सर्वांत सक्रिय खेळाडूंची १०० जणात निवड केली. पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो
रोनाल्डो अव्वल स्थानावर, एनबीए स्टार लेब्रोन जेम्स दुस-या फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी तिस-या आणि टेनिस दिग्गज रॉजर फेडरर चौथ्या स्थानावर आहे.
आघाडीच्या दहा जणांत फिल मिकेलसन, नेमार, हुसेन बोल्ट, केव्हिन डुरेंट, राफेल नदाल आणि टायगर वूड्स यांचा समावेश आहे.