कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला

By admin | Published: March 11, 2017 02:07 AM2017-03-11T02:07:15+5:302017-03-11T02:07:15+5:30

बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार

Kohli indicated his throats | कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला

कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला

Next

मुंबई : बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कोहलीला पायचित दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात पंचांच्या रुममध्ये गेला आणि विराटला बाद का दिले, याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांवर शीतपेयाची बाटली फेकली. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप ‘टेलीग्राफ’ने केला आहे.
बाद झाल्यानंतर कोहलीने एनर्जी ड्रिंकची बाटली टेबलावर फेकली ती आॅस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याला लागली. कुंबळेने जाणूनबुजून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने हे प्रकरण ‘आयसीसी’कडे नेले.
याशिवाय विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बला गळा कापण्याचा इशारा केला होता, असा गंभीर आरोपही वृत्तपत्राने केला आहे. कोहली श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगानंतर सर्वांत खराब कर्णधार असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण
बंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या एकविसाव्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा कणर्धार स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणाऱ्या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट््यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरविले. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडूंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी आॅस्ट्रेलियाकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राईकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला; पण तेथून तो आॅस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रुमकडे पाहत होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करीत होते. पंचांच्याही हे ध्यानात आले. ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असे करू शकत नाहीस, असे ते त्याला म्हणाले. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर आॅस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितले.

Web Title: Kohli indicated his throats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.