आयसीसी संघाचे नेतृत्व कोहलीकडे
By admin | Published: December 23, 2016 01:34 AM2016-12-23T01:34:48+5:302016-12-23T01:34:59+5:30
भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सलग १८ सामने जिंकल्यानंतरही विराट कोहली याला यंदाच्या आयसीसी कसोटी संघात स्थान
दुबई : भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सलग १८ सामने जिंकल्यानंतरही विराट कोहली याला यंदाच्या आयसीसी कसोटी संघात स्थान मिळाले नाही. आॅल स्टार वन डे संघाच्या कर्णधारपदी मात्र त्याची निवड करण्यात आली. या संघात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनाही स्थान देण्यात आले आहे.
आयसीसी कसोटी संघ : अॅलिस्टर कूक कर्णधार, केन विलियम्सन न्यूझीलंड, रविचंद्रन आश्विन भारत, ज्यो रुट इंग्लंड, यष्टिरक्षक जॉनी बेयरेस्टो आणि बेन स्टोक्स इंग्लंड, आॅस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथ आणि अॅडम व्होग्स, मिशेल स्टार्क, द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि श्रीलंकेचा रंगना हेरथ यांचा समावेश आहे.
आयसीसी वन डे संघ : विराट कोहली कर्णधार, डेव्हिड वॉर्नर, क्वींटन डिकॉक, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, एबी डिव्हिलियर्स, जोस बटलर, मिशेल मार्श, कासिगो रबाडा, सुनील नारायण आणि इम्रान ताहीर.