लोकप्रियतेत कोहलीची ‘धोनी’पछाड!
By admin | Published: April 13, 2017 08:38 PM2017-04-13T20:38:11+5:302017-04-13T20:38:11+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.13- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. क्रि केटच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारा कोहली सोशल मीडियावरदेखील फॅन्सचा लाडका आहे.
फलंदाजीसोबतच स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणारा विराट कोहली सोशल मीडियावर अन्य खेळाडूंच्या तुलनेत बराच पुढे गेला आहे. आयपीएल-१० मध्ये आरसीबीचा कर्णधार असलेला विराट सुरुवातीच्या तिन्ही सामन्यास मुकला. यापैकी दोन सामने संघाने गमविताच हा संघ तालिकेत सध्या सहाव्या स्थानावर आहे. तरीही आयपीएलमधील सर्व खेळाडूंपेक्षा कोहलीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत कोहलीने आयपीएलमधील सर्वच खेळाडूंना मागे टाकले. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या १.२४ कोटी आहे. फेसबुकवर विराटला ३.४५ कोटी लोक फॉलो करतात. कोहली टिष्ट्वटरवरदेखील फॉर्मात आहे. टिष्ट्वटरवर विराटला फॉलो करणाºयांचा आकडा १.४८ कोटी आहे.
फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंचा विचार केल्यास विराट कोहली पाठोपाठ महेंद्रसिंग धोनी (पुणे), युवराजसिंग (हैदराबाद), रोहित शर्मा (मुंबई), शाकिब अल हसन (कोलकाता), ख्रिस गेल (बेंगळुरु), शिखर धवन (हैदराबाद), गौतम गंभीर (कोलकाता), हरभजनसिंग (मुंबई) आणि ग्लेन मॅक्सवेल (पंजाब) यांचा क्र म लागतो. इन्स्टाग्राममधील फॉलोअर्सचा विचार केल्यास विराटच अव्वल स्थानी येतो. पाठोपाठ महेंद्रसिंग धोनी (पुणे), एबी डिव्हिलियर्स (बेंगळुरु ), युवराजसिंग (हैदराबाद), रोहित शर्मा (मुंबई), सुरेश रैना (गुजरात), ख्रिस गेल (बेंगळुरु ), हरभजनसिंग (मुंबई), रवींद्र जडेजा (गुजरात) आणि अजिंक्य रहाणे (पुणे) यांचा क्रम येतो.