कोहलीचे द्विशतक, भारत ४ बाद ४०४

By admin | Published: July 22, 2016 09:48 PM2016-07-22T21:48:32+5:302016-07-22T21:48:32+5:30

कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद २०० धावा) १२व्या शतकी खेळीच्या बळावर आणि त्याने अश्विनसोबत पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत धावसंख्या उभी करुन दिली

Kohli's double hundred, India 4 for 404 | कोहलीचे द्विशतक, भारत ४ बाद ४०४

कोहलीचे द्विशतक, भारत ४ बाद ४०४

Next

ऑनलाइन लोकमत

अँटिग्वा, दि. २२  : कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद २०० धावा) १२व्या शतकी खेळीच्या बळावर आणि त्याने अश्विनसोबत पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत धावसंख्या उभी करुन दिली. अश्विनने संयमी अर्धशतक झळकवत ६४ धावावर नाबाद आहे.

२०० धावा फळ्यावर लावगल्या असताना. रहाणेने बिशूच्या चेंडूवर खराब फटका मारल्यावर मिडविकेटवर डेरेन ब्राव्हो याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर कोहलीने यष्टिरक्षक रिद्धिमान सहाऐवजी अश्विनला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णय घेत अनेकांना धक्का दिला. अश्विनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवीत दमदार अर्धशतकी खेळी करत मैदानावर तळ ठोकून आहे. आजच्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी खेळ आर. अश्विन ६४ धावांवर खेळत होता. विंडीजच्या बिशूने १०८ धावांत तीन बळी घेतले आहेत.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या प्रगल्भ खेळाचे दर्शन घडविताना विंडिज विरुद्ध द्विशतक करण्याचा विक्रम केला. पहिल्या दिवशी भारताने सावध सुरुवात करीत उपाहारापर्यंत एक बाद ७२ धावांपर्यंत मजल गाठली होती. त्यानंतर कोहलीने धावांची गती वाढविली. पाटा खेळपट्टीवर विंडीजचे गोलंदाज पाहुण्या फलंदाजांना त्रास देण्यात अपयशी ठरले.

मुरली विजय ७ आणि चेतेश्वर पुजारा १६ हे लवकर बाद झाले. चहापानापर्यंतच्या खेळात भारताने तीन गडी गमविले होते.
चहापानानंतर कोहलीने अजिंक्य रहाणेसोबत(२२) ५७ धावांची भागीदारी केली. या दोघांनी २०० धावा फळ्यावर लावल्या. रहाणेने बिशूच्या चेंडूवर खराब फटका मारल्यावर मिडविकेटवर डेरेन ब्राव्हो याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर कोहलीने यष्टिरक्षक रिद्धिमान सहाऐवजी अश्विनला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णय घेत अनेकांना धक्का दिला. अश्विनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवीत दमदार अर्धसतकी खेळी करत मैदानावर तळ ठोकून आहे. 

Web Title: Kohli's double hundred, India 4 for 404

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.