कोहलीची हिट विकेट, 67 वर्षांनंतर हिट विकेट देणारा दुसरा कप्तान

By admin | Published: November 12, 2016 12:35 PM2016-11-12T12:35:59+5:302016-11-12T12:35:59+5:30

कसोटी सामन्यात हिट विकेट देणारा विराट कोहली दुसरा कर्णधार ठरला आहे. याअगोदर 1949 मध्ये लाला अमरनाथ हिट विकेट झाले होते.

Kohli's hit wicket, the second captain who gave the hit wicket after 67 years | कोहलीची हिट विकेट, 67 वर्षांनंतर हिट विकेट देणारा दुसरा कप्तान

कोहलीची हिट विकेट, 67 वर्षांनंतर हिट विकेट देणारा दुसरा कप्तान

Next
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 12 - भारतीय संघ इंग्लंडविरोधात पहिला कसोटी सामना खेळत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सर्वांचं लक्ष होतं भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे सामन्यात भारताचं पारड जड होईल अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना होता. फलंदाजी करताना फटका मारुन धाव घेणा-या  विराट कोहलीची विकेट गेली आणि सर्वांनाच नेमकं काय झालं कळेना. 
 
इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल राशिद 120वी ओव्हर करत होता. त्याने चेंडू टाकला आणि त्यानंतर सर्व स्टेडिअम शांत झाले. भारतीय चाहते काय झालं ? प्रश्नासह आश्चर्यचकित होऊन पाहत होते तर दुसरीकडे इंग्लंडचे खेळाडू बेल्स खाली पडली असल्याने जल्लोष करत होते. शॉर्ट बॉलवर पूर करुन धाव घेण्याचा प्रयत्न करणार विराट कोहली मैदानात उभा राहून थर्ड अम्पायरच्या निर्णयाची वाट पाहत होता. आणि त्याला हिट विकेट आऊट देण्यात आलं. विराट कोहलीचा पाय स्टम्पला लागल्यानंतर बेल्स खाली पडली होती त्यामुळे त्याला हिट विकेट देण्यात आलं.
 
कसोटी सामन्यात हिट विकेट देणारा विराट कोहली दुसरा कर्णधार ठरला आहे. याअगोदर 1949 मध्ये लाला अमरनाथ हिट विकेट झाले होते. 14 वर्षानंतर भारतीय फलंदाज हिट विकेट झाला असून 2002 मध्ये व्हीव्हीएस लक्ष्म्णची वेस्ट इंडिजविरोधात खेळताना हिट विकेट गेली होती. 
 
विराट कोहली एकदिवसीय सामन्यातही हिट विकेट झाला आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरोधात खेळताना शकत केल्यानंतर स्पिनर ग्रेम खानच्या बॉलवर हिट विकेट झाला होता. 
 

Web Title: Kohli's hit wicket, the second captain who gave the hit wicket after 67 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.