अनुभवातून कोहलीचे नेतृत्वगुण फुलतील!

By admin | Published: January 12, 2015 01:40 AM2015-01-12T01:40:14+5:302015-01-12T01:40:14+5:30

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वकौशल्याशी नवनियुक्त कर्णधार विराट कोहली याची तुलना करणे चुकीचे असून, अनुभवातून कोहलीचे नेतृत्वगुण फुलतील

Kohli's leadership qualities will grow from experience! | अनुभवातून कोहलीचे नेतृत्वगुण फुलतील!

अनुभवातून कोहलीचे नेतृत्वगुण फुलतील!

Next

सिडनी : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वकौशल्याशी नवनियुक्त कर्णधार विराट कोहली याची तुलना करणे चुकीचे असून, अनुभवातून कोहलीचे नेतृत्वगुण फुलतील, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले. तो म्हणाला, कोहलीला नवीन जबाबदारी मिळाली असून, त्याच्याकडे नेतृत्व करण्याचे सर्व गुण आहेत. तो चांगली कामगिरी करेल व तो आक्रमक आहे. अनुभवातून त्याचे नेतृत्वगुण आणखीन सुधरतील. आंतरराष्ट्रीय स्थरावर लाइन आणि लेंथवर गोलंदाजी करणे महत्त्वाचे असते. जोश हेजलवुडने त्याचे उत्तम उदाहरण चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दाखवले. त्याने ८ षटकांत केवळ ३२ धावा दिल्या. त्याने एकाच लाइन आणि लेंथने गोलंदाजी केली आणि गोलंदाजीचे हे महत्त्व आहे. भारतीय गोलंदाजांनी हीच शैली आत्मसात करायला हवी. सद्य:स्थितीत ते १४०च्या गतीने गोलंदाजी करत आहेत आणि अशी गोलंदाजी करत असाल तर तुम्ही साधारण असूच शकत नाही, परंतु कसोटीत गोलंदाजी करताना सातत्य महत्त्वाचे आहे.

Web Title: Kohli's leadership qualities will grow from experience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.