कोहलीचा 'विराट' विक्रम, सर्वात जलद २४ शतके

By admin | Published: January 17, 2016 06:29 PM2016-01-17T18:29:49+5:302016-01-17T18:29:49+5:30

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या आजच्या मेलबर्न वनडेमध्ये भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने दोन विश्वविक्रमास गवसणी घातली आहे.

Kohli's 'Virat' record, the fastest 24 centuries | कोहलीचा 'विराट' विक्रम, सर्वात जलद २४ शतके

कोहलीचा 'विराट' विक्रम, सर्वात जलद २४ शतके

Next
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि.१७ -  भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या आजच्या मेलबर्न वनडेमध्ये भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने दोन विश्वविक्रमास गवसणी घातली आहे. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील वेगवान ७ हजार धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचप्रमाणे, एकदिवसीय करिअरमध्ये सर्वात जलद २४ शतके बनवण्याचा नवा विक्रम त्याने केला. या शतकाबरोबरच विराट पहिला फलंदाज ठरला आहे ज्याने २४ शतके आणि ७ हजार धावांचा टप्पा सर्वात कमी सामने खेळून पूर्ण केला आहे. त्याने सचिन, जयसुर्या, पाँटिग यांना सहज पछाडले. 
विराटने आज १६१व्या डावात हे दोन्ही विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीने केवळ १६९ सामन्यातील १६१ डावांमध्ये या विक्रमाला गवसणी घातली. विराटने आज २४वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या २१९ डावात २४ शतके ठोकण्याचा विक्रम मोडला. 
विराट कोहलीने यापूर्वी ११२ डावात १७ शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. पंरतु हा विक्रम हाशिम आमलाने मोडला होता. आमलाने केवळ ९८ डावातच १७ शतके ठोकून कोहलीचा विक्रम मोडीत काढला होता. 
वनडेमध्ये वेगवान ७ हजार धावांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सच्या नावावर होता. त्याने १७२ वनडेमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठला होता. विराटने १६९ सामन्यात ७ हजार धावा केल्या. डिविलियर्सला हा पल्ला गाठण्यासाठी दहावर्ष लागली विराटने आठपेक्षा कमी वर्षांमध्ये हा पल्ला गाठला. 
डिविलियर्सच्या आधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर हा विक्रम होता. त्याने १८० सामन्यात ७ हजार धावा केल्या होत्या. विराटच्या नावावर २३ शतके आणि ३६ अर्धशतकांची नोंद आहे. 

 

Web Title: Kohli's 'Virat' record, the fastest 24 centuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.