कोहलीची विराट झेप, पुन्हा एकदा अव्वल स्थानी
By admin | Published: June 13, 2017 05:57 PM2017-06-13T17:57:17+5:302017-06-13T18:10:06+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटी भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे
ऑनालइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटी भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. आयसीसीने आज एकदिवसीय क्रमवारी जाहिर केली आहे. विराटने ऑस्ट्रेलियाच्या डेविड वार्नर आणि द. आफ्रिकेच्या एबीला मागे टाकत अव्वल स्थान काबिज केले आहे. सध्या तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या शिखरला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर रोहीत शर्मा आणि एमएस धोनी हे अनुक्रमे तेराव्या आणि चौदाव्या क्रमांवर गेले आहेत. विराट कोहलीला फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक मिळाला असला तरीही भारतीय गोलंदाजांची कामगिरी मात्र खालवताना दिसतं आहे. अक्षर पटेल, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन हे भारताचं फिरकीचं त्रिकूट अनुक्रमे 13, 15 आणि 20 व्या क्रमांकावर आहेत. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रविंद्र जाडेजा हा ८ व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड अव्वल स्थानावर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताचा सामना 15 तारखेला बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यापूर्वी विराटला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीला द. आफ्रिकेचा कर्णधार एबी प्रथम क्रमांकावर होता. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर होता. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा विराट कोहलीला झाला आहे. या स्पर्धेत विराटने आतापर्यंत दोन अर्धशतके केली आहेत. या दोन्ही वेळी विराट नाबाद राहिला आहे. विराट कोहलीच्या नावे 862 अंक आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वॉर्नरच्या नावावर 861 गुण आहेत. एबीच्या नावावर 847 गुण आहेत. चौथ्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंडच्या जो रूटच्या नावार 798 आहेत. पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन आहे. टीम रॅकिंगमध्ये द. आफ्रिका पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानर तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.