मराठमोळ्या सोनमचा रौप्य वेध! वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या लेकीची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:10 IST2024-10-16T13:09:59+5:302024-10-16T13:10:09+5:30
सोनम मस्करची १० मीटर एअर रायफलमध्ये चमक.

मराठमोळ्या सोनमचा रौप्य वेध! वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या लेकीची कमाल
ISSF World Cup shooting 2024 : कोल्हापूरच्या सोनम मस्करने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना १० मीटर एअर रायफल गटात रौप्य पदक पटकावले. केवळ दोन वर्षांपूर्वी स्पर्धात्मक नेमबाजीला सुरुवात केलेल्या २२ वर्षीय सोनमला गेल्याच वर्षी राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. अंतिम फेरीत सोनमने २५२.९ गुणांचा वेध घेतला.
चीनच्या हुआंग यूटिंगने २५४.५ गुणांसह सुवर्ण जिंकले. हुआंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले होते. त्याचवेळी, आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीतील अन्य भारतीय नेमबाज तिलोत्तमा सेनला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. पुरुषांमध्ये १० मीटर एअर रायफल गटात अर्जुन बबूताला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये ऑलिम्पियन सांगवानला चौथ्या स्थानासह थोडक्यात कांस्य पदकापासून मुकावे लागले.