कोलकातावर मुंबईचा सहा गडी राखून विजय

By admin | Published: April 28, 2016 11:18 PM2016-04-28T23:18:05+5:302016-04-28T23:33:18+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वात फलंदाज रोहित शर्मा आणि पोलार्डच्या शानदार अर्धशतकीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट राइडर्सवर सहा गडी राखून विजय मिऴविला.

Kolkata beat Mumbai by six wickets | कोलकातावर मुंबईचा सहा गडी राखून विजय

कोलकातावर मुंबईचा सहा गडी राखून विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - आयपीएलच्या नवव्या पर्वात फलंदाज रोहित शर्मा आणि  पोलार्डच्या शानदार अर्धशतकीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट राइडर्सवर सहा गडी राखून विजय मिऴविला. कोलकाता नाइट राइडर्सवर दिलेल्या १७५ धावांचा सामना करताना मुंबई इंडियन्सने १८ षटकात चार बाद १७८ धावा केल्या. 
या सामन्यात पोलार्डने धुव्वादार खेळी करत अवघ्या १७ चेंडूत सहा षटकार आणि दोन चौकार लगावत नाबाद ५१ धावा कुटल्या. तर, रोहित शर्माने ४९ चेंडूत ६८ धावा केल्या. सुरुवातीला पार्थिव पटेल अवघ्या एक धावेवर तंबूत परतला. अंबाती रायडूने २० चेंडूत एक षटकार आणि पाच चौकार लगावत ३२ धावा केल्या. त्याला गोलंदाज शकिब अल हसनने झेलबाद केले. कृनाल पांड्या सहा धावा काढून बाद झाला, तर जॉस बटलर १५ धावांवर बाद झाला. 
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात फलंदाज गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने २० षटकात पाच  बाद १७४ धावा केल्या. गौतम गंभीरने ४५ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकार लगावत ५९ धावा केल्या. तर, रॉबिन उथप्पाने ३६ धावा केल्या. सुरुवातीला गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाने ७.४ षटकात ६९ धावांची धमाकेदार सलामी दिली. रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतर शाकिब अल हसन अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरने संघाची धावसंख्या वाढवली. 
गौतम गंभीर झेलबाद झाल्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवला आपला संयम राखता आला नाही. तो संघाच्या १३० धावा असताना २१ धावांवर बाद झाला. याचबरोबर रसेलही जास्त काऴ टिकू शकला नाही तो २२ धावांवर बाद झाला. तर ख्रिस लेन नाबाद १० धावा आणि युसूफ पठाणने नाबाद १९ धावा ठोकल्या. 
मुंबई इंडियन्सकडून साउदीने २ बळी टिपले, तर मॅकलन, हरभजन आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कोलकाता नाइट राइडर्सकडून गोलंदाज सुनिल नारायणने दोन बळी घेतले, तर शकिब अल हसन आणि यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. 

Web Title: Kolkata beat Mumbai by six wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.