कोलकाता नाइट रायडर्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय

By admin | Published: April 19, 2016 11:14 PM2016-04-19T23:14:47+5:302016-04-19T23:27:24+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Kolkata Knight Riders beat Kings XI Punjab | कोलकाता नाइट रायडर्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय

कोलकाता नाइट रायडर्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय

Next

ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. १९ - कोलकाता नाइट रायडर्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.  किंग्ज इलेव्हन पंजाबनं 139 धावांचं दिलेलं लक्ष्य भेदत कोलकाता नाइट रायडर्सनं निर्भेळ विजय मिळवला आहे. कोलकातानं 6 गडी राखून 17 षटकांत 141 धावा केल्या. उथप्पानं 9 चौकारासह  २८ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. गंभीर 34, पंड्या 12, शाकिब हसन 11, यादव* 11, पठाण*12 रन्स काढत विजय खेचून आणला. पंजाब कढून पटेल आणि शाहूने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.

त्यापुर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट रायडर्ससमोर  २० षटकात १३९ धावांचे लक्ष ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकात आठ बाद १३८ धावा केल्या.  शॉन मार्शने संयमी फलंदाजी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न करत नाबाद ५६ धावा केल्या. 

किंग्ज इलेव्हन पंजाबची तगडी फलंदाजी या सामन्यात अपयशी ठरली. पंजाब संघाची मधली फळी लवकर तंबूत परतली. काईल अ‍ॅबोट नाबाद १२ धावा केल्या, तर मुरली विजय या सामन्यात २६ धावा काढून बाद झाला. मनन व्होरा (८), वृद्धिमान साहा (८), मिलेर (६), ग्लेन मॅक्सवेल (४),  अक्षर पटेल (९), मोहित शर्मा आणि प्रदीप साहू अवघ्या एक धावा काढून बाद झाले. 
 
कोलकाता नाइट रायडर्सकडून गोलंदाज सुनील नारायण आणि मोर्ने मॉर्केल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर युसूफ पठाण, उमेश यादव आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक बऴी घेतले. 

Web Title: Kolkata Knight Riders beat Kings XI Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.