बलजितमुळे कोलकाता संघ संतुलित
By admin | Published: November 25, 2014 01:00 AM2014-11-25T01:00:54+5:302014-11-25T01:00:54+5:30
व्वा कोलकाता..! येथे येण्याआधी या शहराचे फुटबॉलप्रेम ऐकले होते. ते चुकीचे नव्हते. स्पेनमधील सरावानंतर येथे दाखल होताच लोकांचे फुटबॉलप्रेम पाहून आश्चर्यचकित झालो.
Next
अॅन्टोनियो लोपेझ हबास
व्वा कोलकाता..! येथे येण्याआधी या शहराचे फुटबॉलप्रेम ऐकले होते. ते चुकीचे नव्हते. स्पेनमधील सरावानंतर येथे दाखल होताच लोकांचे फुटबॉलप्रेम पाहून आश्चर्यचकित झालो. येथील भव्य स्टेडियमपासून गर्व वाटला; पण मनात प्रश्न आला, की इतक्या मोठय़ा संख्येने प्रेक्षक येतील का? हे यासाठी की स्टेडियम फारच प्रशस्त आहे.
पण, जितक्यांदा आम्ही मैदानात उतरलो, त्या वेळी लोकांचे लोंढे उपस्थित होते. येथे खेळण्याविषयी अभिमान वाटतो. मोठय़ा संख्येने
गर्दी केल्याबद्दल सर्वाप्रती मी कृतज्ञ आहे.
स्पेनमध्ये झालेला सराव मोलाचा आहे. त्यामुळे खेळाडूंना परस्परांना समजून घेता आले. यामुळे क्षमता ओळखू शकलो, शिवाय लक्ष्याकडे धाव घेता येते.
सर्वात महत्त्वपूर्ण बाब अशी की, अॅटलिटिको डी कोलकाताची ओळख केवळ विदेशी खेळाडूंमुळे नाही. उदा. बलजित साहनीचा खेळ बघा. तो संघात संतुलन साधण्यात मोलाची भूमिका बजावतो. हा प्रतिभावान खेळाडू अखेर्पयत प्रतिकार
करतो. सुभाशिष रॉय चौधरी आणि अर्णब मंडल हे असेच भक्कम खेळाडू आहेत.
भारतीयांचे भाग्य असे की, त्यांना लुईस गार्सियासारखा मेंटर
लाभला. लुईस करियरमध्ये जितका उत्साही खेळाडू होता, तोच
उत्साह अद्याप कायम आहे.
स्वत:च्या खेळामुळे त्याने आदर्श निर्माण केला. संघ त्याच्यापासून शिकत आहे.
स्पर्धेदरम्यानचा प्रवास आणि विविध ठिकाणी ताळमेळ साधणो सोपे नसते. पण मी यामुळे चिंतित नाही. घरच्या मैदानावर जे निकाल देण्यास सक्षम आहोत, तसाच निकाल प्रतिस्पर्धी मैदानातही देण्यास सक्षम आहोत.
आमची आक्रमकता आणि विजयाची भूक यात फरक पडलेला नाही. संघाला आणि खेळाडूंना आपल्या क्षमतेवर विश्वास आहे. आता पुणो सिटी एफसीविरुद्ध सामना खेळायचा असून, त्यासाठी काही मुद्यांवर गंभीरपणो सुधारणा करावी लागेल. आम्ही उणिवा दूर करू शकतो. (टीसीएम)
(लेखक अॅटलेटिको डी कोलकाता संघाचे कोच आहेत.)