कोलकाताचे मुंबईसमोर १७५ धावांचे आव्हान
By Admin | Published: April 28, 2016 09:36 PM2016-04-28T21:36:34+5:302016-04-28T21:49:19+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात फलंदाज गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ : आयपीएलच्या नवव्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात फलंदाज गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने २० षटकात पाच बाद १७४ धावा केल्या. गौतम गंभीरने ४५ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकार लगावत ५९ धावा केल्या. तर, रॉबिन उथप्पाने ३६ धावा केल्या. सुरुवातीला गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाने ७.४ षटकात ६९ धावांची धमाकेदार सलामी दिली. रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतर शाकिब अल हसन अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादाव आणि गौतम गंभीरने संघाची धावसंख्या वाढवली.
गौतम गंभीर झेलबाद झाल्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवला आपला संयम राखता आला नाही. तो संघाच्या १३० धावा असताना २१ धावांवर बाद झाला. याचबरोबर रसेलही जास्त काऴ टिकू शकला नाही तो २२ धावांवर बाद झाला. तर ख्रिस लेन नाबाद १० धावा आणि युसूफ पठाणने नाबाद १९ धावा ठोकल्या.
मुंबई इंडियन्सकडून साउदीने २ बळी टिपले, तर मॅकलन, हरभजन आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.