विंडीज दौऱ्यापर्यंत कुंबळे प्रशिक्षकपदी कायम
By admin | Published: June 13, 2017 04:46 AM2017-06-13T04:46:51+5:302017-06-13T04:46:51+5:30
अनिल अनिल कुंबळे यांनी मंजुरी दिली, तर ते विंडीज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदी कायम असतील, असे बीसीसीआयच्या प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अनिल अनिल कुंबळे यांनी मंजुरी दिली, तर ते विंडीज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षकपदी कायम असतील, असे बीसीसीआयच्या प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले. नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याचा निर्णय क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) घेईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सीओएच्या बैठकीनंतर बोलताना राय म्हणाले, ‘प्रशिक्षकाची निवड करण्याचा अधिकार सीएसीचा आहे. सीएसीने गेल्या वर्षी अनिल कुंबळे यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. प्रशिक्षकाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याला थोडा विलंब होत आहे. जर कुंबळे यांचा होकार असेल, तर ते विंडीज दौऱ्यापर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. प्रशिक्षकाबाबतचा निर्णय घेण्यासाठी सीएसीची लंडनमध्ये बैठक होणार आहे.’ भारतीय संघ पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. मालिकेतील पहिली लढत २३ जून रोजी होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-२० सामना ९ जुलै रोजी खेळला जाणार आहे. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी राजीनामा दिल्यानंतर सीओएमध्ये आता केवळ तीन सदस्य आहेत.(वृत्तसंस्था)