कुंबळे खेळाडूंना हवे तसे वागू देणारा प्रशिक्षक नाही - गावसकर

By admin | Published: June 21, 2017 11:59 AM2017-06-21T11:59:54+5:302017-06-21T12:08:09+5:30

माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादळाची सुरुवात झाली आहे.

Kumble is not a coaching coach of players - Gavaskar | कुंबळे खेळाडूंना हवे तसे वागू देणारा प्रशिक्षक नाही - गावसकर

कुंबळे खेळाडूंना हवे तसे वागू देणारा प्रशिक्षक नाही - गावसकर

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 21- माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादळाची सुरुवात झाली आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कर्णधार कोहली आणि प्रशिक्षकाच्या वादात कुंबळेची बाजू उचलून धरली आहे. 
 
भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्याशी नरमाईने वागणारा प्रशिक्षक हवा आहे. तुम्हाला आज बरे वाटत नाहीय. मग सराव करु नका. सुट्टी घ्या, शॉपिंगला जा असे म्हणणारा प्रशिक्षक हवा असेल तर, कुंबळे त्यामध्ये फीट बसत नाही असे गावसकर यांनी म्हटले आहे. अनिल कुंबळे सारख्या मेहनती प्रशिक्षकाने मागच्या वर्षभरात चांगला निकाल दिला आहे. कुंबळेबद्दल जे खेळाडू तक्रार करत असतील त्यांना खरतर संघाबाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे असे गावसकर यांनी म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
जंबोचा कोहलीवर विराट आरोप
कुंबळेचा राजीनामा!
 
कुंबळेने मागच्या वर्षभरात संघाला जे मिळवून दिलेय ते असामान्य आहे असे गावसकर यांनी म्हटले आहे. अनिल कुंबळे पायउतार झाल्यानंतर येणा-या नव्या कोचसाठी आपण काय संदेश देणार आहोत. एकतर खेळाडूंच्या विचारांशी जुळवून घे किंवा अनिल कुंबळेसारखा असशील तर पायउतार हो, हे खूपच वाईट असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे. 
 
दोन किंवा तीन पेक्षा जास्त लोक असतील तर मतभेद असतात. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर भारताने अनेक विजय मिळवले. मागच्यावर्षभरात कुंबळेने काही चुकीचे केलेय असे मला वाटत नाही असे गावसकर म्हणाले. पद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
 
आपल्या पोस्टमध्ये जंबो म्हणतो, गेलं वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला आहे.बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. 
 

Web Title: Kumble is not a coaching coach of players - Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.