कुंबळे प्रकरण; वेळेची उणीव यामुळे गुहा यांचा राजीनामा

By admin | Published: June 2, 2017 01:00 AM2017-06-02T01:00:06+5:302017-06-02T01:00:06+5:30

रामचंद्र गुहा यांनी प्रशासकांच्या समितीमधून (सीओए) राजीनामा दिला असून त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला

Kumble's case; Guha resigns due to lack of time | कुंबळे प्रकरण; वेळेची उणीव यामुळे गुहा यांचा राजीनामा

कुंबळे प्रकरण; वेळेची उणीव यामुळे गुहा यांचा राजीनामा

Next

नवी दिल्ली : रामचंद्र गुहा यांनी प्रशासकांच्या समितीमधून (सीओए) राजीनामा दिला असून त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला आहे. भारतीय प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चेसोबत या घटनेचा संबंध जोडला जात आहे.
गुहा यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. गुहा यांच्या निर्णयामुळे सीओएला आश्चर्य वाटले आहे. गुहा यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयाबाबत सीओएतील आपल्या सहाकाऱ्यांसोबत चर्चा केली नाही. मी माझ्या निर्णयाबाबत समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना सांगितले असल्याचे गुहा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. गुहा यांना व्यावसायिक व्यस्ततेमुळे बीसीसीआयच्या बैठकीमध्ये सहभागी होत येत नव्हते. वेळ नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी चर्चा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Kumble's case; Guha resigns due to lack of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.