चॅम्पियन्स स्पर्धेनंतर कुंबळेंच्या नव्या कराराबाबत निर्णय

By Admin | Published: May 11, 2017 08:35 PM2017-05-11T20:35:52+5:302017-05-11T20:35:52+5:30

इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल

Kumble's new contract after the Champions Trophy | चॅम्पियन्स स्पर्धेनंतर कुंबळेंच्या नव्या कराराबाबत निर्णय

चॅम्पियन्स स्पर्धेनंतर कुंबळेंच्या नव्या कराराबाबत निर्णय

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि . 11  : इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कुंबळे यांची गतवर्षी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या वेळी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. जूनअखेरीस त्यांचा करार संपणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, कुंबळे यांच्याबरोबरच्या कराराचे नूतनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र चॅम्पियन्सनंतर बीसीसीआयची आमसभा असून त्यात अधिकृत निर्णय घेतला जाईल. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चॅम्पियन्सपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. कुंबळे यांच्या नव्या कराराबाबत मंडळाच्या व्यवस्थापन समितीकडून परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत ही समिती कार्यरत आहे, तोपर्यंत मंडळाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाला या समितीची परवानगी अनिवार्य आहे, असेही मंडळाकडून सांगण्यात आले. कुंबळे यांच्याकडे प्रशिक्षकपद आल्यापासून भारताने पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. २०१६-१७ मध्ये भारताने १७ कसोटी सामन्यांपैकी १२ सामने
कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकले आहेत. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध २-०, न्यूझीलंडविरु द्ध ३-०, इंग्लंडविरु द्ध ४-० अशा कसोटी मालिका जिंकल्या. बांगला देशविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीतही भारताला विजय मिळाला होता. फक्त आॅस्ट्रेलियाविरु द्ध पुण्यात झालेल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. अर्थात भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. भारतात झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकांपैकी न्यूझीलंडवर त्यांनी ३-२ अशी मात केली तर
इंग्लंडविरु द्ध त्यांना २-१ असा विजय मिळाला. राष्ट्रीय निवड समितीमध्ये फक्त तीनच सदस्यांचा समावेश असून, त्यामुळे येणाऱ्या अडचणींबाबत अनेक राज्य संघटनांनी सीओए प्रमुख विनोद राय यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रणजी स्पर्धेत ससुमारे ३० संघांचा समावेश असून, केवळ तीनच सदस्यांची राष्ट्रीय समिती अपुरी असल्याचे मत अनेक संघटकांनी व्यक्त केले.

Web Title: Kumble's new contract after the Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.