खळबळजनक! Kylian Mbappe वर बलात्काराचा आरोप; स्टार फुटबॉलरनं अशी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:46 PM2024-10-15T13:46:25+5:302024-10-15T13:48:15+5:30

फुटबॉलरनं मात्र ही 'फेक न्यूज' असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही त्याने सुरु केलीये.  

Kylian Mbappe Accused of Rape in Sweden; Calls it 'Fake News' | खळबळजनक! Kylian Mbappe वर बलात्काराचा आरोप; स्टार फुटबॉलरनं अशी दिली प्रतिक्रिया

खळबळजनक! Kylian Mbappe वर बलात्काराचा आरोप; स्टार फुटबॉलरनं अशी दिली प्रतिक्रिया

Kylian Mbappe Accused of Rape in Sweden; Calls it 'Fake News' : फुटबॉल जगतातील नवा हिरो आणि युवा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापे गंभीर आरोपामुळे अडचणीत आला आहे. फ्रान्स आणि रिअल मॅड्रिडच्या ताफ्यातून खेळणाऱ्या या स्टार फुटबॉलरनं एका महिलेच्या अब्रूला हात घातल्याचा दावा एका रिपोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या वृत्तामुळे एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण एम्बाप्पे ब्रेकवर असताना घडल्याचा उल्लेखही संबंधित वृतामध्ये करण्यात आला आहे. दुसरीकडे फुटबॉलरनं मात्र ही 'फेक न्यूज' असल्याचे सांगत गंभीर आरोप असणारा दावा फेटाळून लावला आहे. संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही त्याने सुरु केलीये.  

स्वीडनमध्ये घडला प्रकार; काय आहे  फुटबॉलरवरील आरोप? 

स्वीडनचं दैनिक वृत्तपत्र अफ्टोंब्लाडेट (Aftonbladet Mewspaper) च्या वृत्तानुसार,  किलियन एम्बापे याने नेशन कप टूर्नामेंटमध्ये संघाकडून मैदानात उतरण्याऐवजी ब्रेक घेण्याला पसंती दिली होती. यादरम्यान तो आपल्या मित्रमंडळींसोबत स्वीडनला गेला होता. स्टॉकहोम सिटी सेंटरमधील एका रेस्टोरंटमध्ये जेवण केल्यावर त्याने एका महिलेचा लैंगिक छळ केला. याप्रकरणात संबंधित पीडित महिलेनं  स्टॉकहोम पोलिसांत फुटबॉलरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

'फेक न्यूज' म्हणत फुटबॉलरनं फेटाळले आरोप 
 
स्वीडनच्या वृत्तपत्रातील बातमीसमोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्यावर फुटबॉलरलाही आपली बाजू मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यास भाग पाडले.  त्याने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. 

माझ्या विरोधात कटकारस्थान, काय म्हणाला एम्बापे?

किलियन एम्बापेनं एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) लिहिलय की,  'ही बातमी साफ खोटी आहे. या अफवेमुळे मी स्तब्ध झालोय. संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाईसाठी मी सल्ला घेत आहे." नाव खराब करण्यासाठी हे माझ्या विरोधात एक कटकारस्थान रचण्यात आले आहे, असा उल्लेखही  एम्बाप्पेनं आपल्या पोस्टमध्ये केला आहे. यामागे माजी क्लब पॅरिस सेंट जर्मेनसोबतच्या सॅलरी प्रकरणावरून सुरु असल्याच्या वादाची किनार असल्याची शंकाही त्याने उपस्थित केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

 नव्या जमान्यातील नवा स्टार फुटबॉलपटू आहे किलियन एम्बापे  

किलियन एम्बापे हा फुटबॉल जगतातील एक नवा तारा आहे.मागच्या हंगामापर्यंत तो नेमार आणि लियोनेल मेस्सीसोबत पीएसजी क्लबकडून खेळताना दिसला होता. हा क्लब सोडून तो रोनाल्डोच्या जागी रिअल मॅड्रिडच्या ताफ्यात गेला. रोनाल्डोची जागा भरून काढणाऱ्या या गड्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी या क्लबनं मोठी रक्कमही मोजली होती.  

Web Title: Kylian Mbappe Accused of Rape in Sweden; Calls it 'Fake News'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.