किर्गिस्तानचा आशियाई कुस्ती आयोजनास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:44 AM2020-03-01T05:44:29+5:302020-03-01T05:44:32+5:30
कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता किर्गिस्तानने आशियाई आॅलिम्पिक पात्रता कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता किर्गिस्तानने आशियाई आॅलिम्पिक पात्रता कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला. ही स्पर्धा २७ ते २९ मार्च या कालावधीत राजधानी बिश्केक येथे होणार होते.
या आधी ही स्पर्धा चीनमधील झिढयान येथे आयोजित करायची होती. मात्र, कोरोनामुळे चीनमधील सर्वच आयोजन रद्द करण्यात आले. किर्गिस्तानने कोरोनामुळे देशातील सर्व आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीचे संचालन करणाऱ्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या संस्थेने बिश्केकमधील आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती सर्व देशांना दिली. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीसोबत चर्चा केल्यानंतर अन्य पर्यायांबाबत कळविण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे. भारताचे १४ सदस्यांचे पथक या स्पर्धेसाठी जाणार होते.