भारतीय गोलंदाजांमध्ये शिस्तीचा अभाव
By Admin | Published: September 15, 2015 03:10 AM2015-09-15T03:10:34+5:302015-09-15T03:10:34+5:30
भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये गुणवत्ता खूप आहे. परंतु त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव आहे. भारतीयांची गोलंदाजी करताना एकाग्रता लवकर भंग पावते आणि यामुळे त्यांची
मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये गुणवत्ता खूप आहे. परंतु त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव आहे. भारतीयांची गोलंदाजी करताना एकाग्रता लवकर भंग पावते आणि यामुळे त्यांची कामगिरी खालावते, असे आॅस्टे्रलियाचे महान माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांनी सांगितले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने एका नामांकीत बँकेच्या पुढाकाराने नवोदित मुंबईकर गोलंदाजांसाठी सुरु केलेल्या ‘बॉलिंग फाऊंडेशन’साठी थॉमसन यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. यानिमित्ताने भारतात आलेल्या थॉमसन यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. यावेळी माजी क्रिकेटपटू आणि एमसीए उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू मकरंद वायंगणकर, विघ्नेश शहाणे आणी एमसीए संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांची उपस्थिती होती.
सध्या भारतीय खेळाडूंच्या आणि खास करुन इशांत शर्माच्या आक्रमकपणावर टीकेचे झोड उठत आहे. इशांतच्या या आक्रमकपणा विषयी थॉमसन म्हणाले की, इशांतपणे गुणवत्तेची नक्कीच कमी नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे. परंतु त्याच्याच शिस्तीची कमी असल्याचे कधी कधी तो भरकटतो. आठ वर्षांपुर्वी त्याला बघितले होते तेव्हा वाटले होते की इशांत जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज होईल. मात्र यामध्ये तो अपयशी ठरला.
पाटा खेळपट्ट्यांबाबत थॉमसन यांनी सांगितले, भारतीय वातावरणात व खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते.
मी थॉमसन यांचा सामना केला असून त्यांचा मारा अत्यंत भेदक होता. यापुर्वीही मुंबईतील गुणवान गोलंदाजाांसाठी अशाच प्रकारे उपक्रम घेण्यात आला होता. त्यामुळेच मुंबईला अॅबी कुरविल्ला, पारस म्हांबरे, साईराज बहुतुले व निलेश कुलकर्णी सारखे गोलंदाज मिळाले. थॉमसन यांचा निश्चित मुंबईला फायदा होईल. मुंबईकडे टॅलेंट आहे मात्र मार्गदर्शन नाही. - दिलीप वेंगसरकर,
उपाध्यक्ष, एमसीए