लाहिरीला 69वे जागतिक मानांकन
By Admin | Published: October 28, 2014 01:05 AM2014-10-28T01:05:17+5:302014-10-28T01:05:17+5:30
मकाऊ ओपनमध्ये अजिंक्यपद मिळविणारा भारतीय गोल्फर अनिर्वाण लाहिरी विश्व रँकिंगमध्ये 21 स्थानांची उडी घेत 69 व्या स्थानावर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : मकाऊ ओपनमध्ये अजिंक्यपद मिळविणारा भारतीय गोल्फर अनिर्वाण लाहिरी विश्व रँकिंगमध्ये 21 स्थानांची उडी घेत 69 व्या स्थानावर पोहोचला आहे.
लाहिरी आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च 64 व्या स्थानापासून केवळ 5 स्थान मागे आहे. हे रॅकिंग त्याने या वर्षीच्या सुरुवातीला इंडोनेशियातील स्पर्धा जिंकून मिळविले होते. सध्याच्या रँकिंग यादीत लाहिडी हा सर्वोच्च स्थानी असलेला भारतीय आहे. शिव कपूरचा त्याच्यानंतर क्रमांक लागतो. तो 215 व्या स्थानी आहे. भारताच्या जीव मिल्खासिंगने भारताकडून सर्वोच्च म्हणजे 29 वे रँकिंग मिळविले होते. 2009मध्ये हा विक्रम त्याने नोंदविला होता. (वृत्तसंस्था)
लाहिडीने एशियन टूर ऑर्डर ऑफ मेरीटमध्ये आपले दुसरे स्थान निश्चित केले आहे. यामध्ये अव्वलस्थानावर असलेल्या अमेरिकेच्या डेव्हिड लिप्स्की याच्यामध्ये असलेले अंतर लाहिडीने कमी केले आहे. लिप्सकीच्या नावावर सुमारे सहा लाख सत्तर हजार डॉलर्सची कमाई नोंद आहे.
लाहिडीने मकाऊ ओपन स्पर्धा जिंकून आपले कारकिर्दीतील 16 वे विजेतेपद जिंकले आहे. त्याचे हे पाचवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
मकाऊ ओपनमध्ये विजय मिळवून लाहिरीने एक लाख 62 हजार डॉलर्स इतक्या रकमेचा पुरस्कार जिंकला. यामुळे या सत्रतील त्याने मिळविलेल्या बक्षिसाची रक्कम सुमारे पाच लाख पाच हजार डॉलर्स इतकी झाली आहे.