ललिताने रचला इतिहास, ऑलिम्पिकची फायनल गाठणारी भारताची पहिली अॅथलीट
By admin | Published: August 13, 2016 08:45 PM2016-08-13T20:45:25+5:302016-08-13T21:17:27+5:30
महाराष्ट्राची शान असलेली ललिता बाबरने महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतील अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चत करून इतिहास रचला आहे
Next
>- शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. 13 - सातारा जिल्ह्यातील मोही (ता माण)या छोटयाश्या गावातील महाराष्ट्राची शान असलेली ललिता बाबरने महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेस शर्यतील अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चत करून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी ललिता पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. यासोबतच ललिताने राष्ट्रीय विक्रमदेखील रचला आहे.
प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून ललिता बाबरने नवा राष्ट्रीय विक्रम रचला आहे. जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवत ललिताने अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित झाला. 15 ऑगस्टला अंतिम फेरी पार पडणार आहे. ललिता बाबर यावेळी पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा ठसा उमटवेल अशी सर्वांना आशा आहे.
‘माणदेशी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या ललिता शिवाजी बाबर शुक्रवारी सकाळी येते थंड वातावरणात जेव्हा महिलांच्या तीन हजार मीटर शर्यतसाठी ललिता मैदानावर आली तेव्हा नेहमीप्रमाणे तीच्या चेहºयावर कोणतेही भाव नव्हते. मात्र चेहºयावर आत्मविश्वास होता. जेव्हा शर्यत सुरु झाली तेव्हा तीने पहिल्या कोर्बन इम्मा, चेपोक्चे बेटराईस, छारीबी हाबीबा, हेनरेना हिल्स व कोवालमाट्याल्हा यांच्या जथ्थात आपली वर्णी लावली. सुरूवातीपासून तीने कोणतीही घाई न करता शर्यतीत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न (रेज लीड) केला नाही. तीने मात्र पहिला जथ्था सोडला नाही. साडेसात फे-याच्या या शर्यतीत ललिताने सहा फे-यापर्यंत आपला जथ्था सोहला नाही. नंतर तीने पहिल्या चेपोक्चे बोटराईस, छारीवी हाबीबा यांच्या बरोबरीने धावत होती. शेवटची ६ मीटर राहिले असताना तीने थोडी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. पण, तीच्या बरोबर धावणाºया धावपटू बरोबरच होत्या.
शेवटच्या दोन मिटरला ती चौथ्या क्रमांकावर आली आणि तीने याच क्रमांकावर ९ मिनिट १९.७६ सेकंदाची वेळ नोंदविली. जेव्हा तीने शर्यत पूर्ण केली तेव्हा ती पात्र होणार की नाही याकडे सर्वांचे लागून राहिले. पण जेव्हा दुसºया व तीसºया फेरीचा निकाल जाहिर झाला. तेव्हा तीच्यासह सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अंतिम फेरीसाठी तीन्ही फेºयांमधून पहिले तीन म्हणजे एकूण ९ आणि पराभूत झालेल्या धावपटूंमध्ये ज्यांनी चांगली वेळ नोंदविली त्यातील पहिले ६ धावपटू होणार होते. आणि ललिताने जी वेळ नोंदविली त्यामुळे ती एकूण सातव्या क्रमांकावर पोहोचली, या तिच्या अंतिम फेरीतील प्रवेशाने अॅथलेटिक्समधील पदकाची आशा उंचावली आहे. दुसरीकडे भारताच्या सुधा सिंगला मात्र अंतिम फेरीत पात्र होण्यात अपयश आले.