ललिताने केला सुवर्णासह शेवट गोड

By admin | Published: February 14, 2015 12:24 AM2015-02-14T00:24:04+5:302015-02-14T00:24:04+5:30

महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १

Lalit made sweet sweet with sweet | ललिताने केला सुवर्णासह शेवट गोड

ललिताने केला सुवर्णासह शेवट गोड

Next

तिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १३ व्या दिवशी महाराष्ट्र संघाला एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कास्यपदकांवर समाधान मानावे लागले. रांची येथील स्पर्धेत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महाराष्ट्राला यावेळी चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
अ‍ॅथलेटिक्स : महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात इचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्यपदकविजेती ललिता बाबरने शर्यतीच्या सुरुवातीपासून वर्चस्व राखत आघाडी घेतली होती. तिने ही शर्यत ९ मिनिटे ४२.६३ सेकंदाची वेळ नोंदवून आपल्या संघाला या
क्रीडाप्रकारातील शेवटचे सुवर्ण जिंकून दिले. याच प्रकारात जयश्री बोरगीने शर्यत १० मि. ०४.३० से. पूर्ण करून कास्य तर पुरुषांच्या याच क्रीडाप्रकारात सचिन पाटीलने ९ मि. ००.२७ सेकंदाची वेळ नोंदवून कास्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये लियोन टी., सनी पाटील, दत्ता झोडगे व किरण डोइफोडे यांच्या जिगरबाज पळतीमुळे आपल्या संघाला कास्यपदक जिंकून दिले.
कबड्डी : महाराष्ट्राच्या महिला संघाना अंतिम फेरीत हरियानाकडून १७-२० गुणांनी पराभव पत्करावा लागला. लढतीच्या शेवटच्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या महिलांनी आतताईपणा केल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून सायली केरीपाळे, सुवर्णा बारटक्के, मीनल जाधव, अभिलाषा म्हात्रे व स्नेहल शिंदे यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला.
तायक्वाँदो : महाराष्ट्राच्या अंकिता पाटीलने ४९ किलो गटात कास्यपदक जिंकले.
वुशू : महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने जियान वुशू प्रकारात ७.०३ गुण संपादन करून कास्यपदक जिंकले.
रग्बीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला अंतिम फेरीत ५-१७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
(वृत्तसंस्था)

Web Title: Lalit made sweet sweet with sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.