ललित मोदींनी दिली फिक्सर खेळाडूंची माहिती

By admin | Published: June 29, 2015 01:14 AM2015-06-29T01:14:49+5:302015-06-29T01:14:49+5:30

आयपीएलचे माजी वादग्रस्त आयुक्त ललित मोदी यांनी क्रिकेट फिक्सिंगमध्ये सहभाग असलेल्या तीन मोठ्या क्रिकेटपटूंचे नाव उघड करुन एकच खळबळ माजवली आहे.

Lalit Modi gave information about fixer players | ललित मोदींनी दिली फिक्सर खेळाडूंची माहिती

ललित मोदींनी दिली फिक्सर खेळाडूंची माहिती

Next

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी वादग्रस्त आयुक्त ललित मोदी यांनी क्रिकेट फिक्सिंगमध्ये सहभाग असलेल्या तीन मोठ्या क्रिकेटपटूंचे नाव उघड करुन एकच खळबळ माजवली आहे. यामधील दोन खेळाडू भारतीय असून एक खेळाडू वेस्ट इंडिजचा आहे. या तिन्ही खेळाडूंना एका रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठ्या उद्योगपतीने लाच दिल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.
लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदी यांनी एक पत्र ट्वीट केले असून, हे पत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सीईओ डेव रिचडर््सन यांना जून २०१३ मध्ये पाठवले असल्याचा दावा केला आहे. शिवाय या पत्रामध्ये त्यांना तथ्य
वाटत असेल तर त्यांनी ते पत्र आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा समितीला द्यावे असेही सांगितले.
यानंतर मोदी यांनी त्या तीन मोठ्या खेळाडूंचे नाव जाहीर करुन खळबळ उडवून दिली असून, हे तिन्ही खेळाडू एका मोठ्या रिअल इस्टेट उद्योगपतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तसेच हा उद्योगपती मोठा सट्टेबाज असल्याचा दावा देखील मोदी यांनी केला आहे.
मोदी यांनी याबाबत सांगितले की, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये या उद्योगपतीने या तिन्ही खेळाडूंना रोख रक्कम व इतर स्वरुपात लाच दिली आहे. तसेच ही माहिती खोटी असेल अशी आशा करतो, मात्र जर का यात तथ्य असेल तर याचा अर्थ असा आहे की यामध्ये अजूनही अनेकांचा समावेश असू शकतो, असेही मोदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

२०१३ मध्ये ललित मोदींचा ई-मेल मिळाला होता : आयसीसी
दुबई : ललित मोदी यांनी २०१३ मध्ये पाठविलेला ई-मेल मिळाला होता, असे आयसीसीतर्फे आज स्पष्ट करण्यात आले. त्यात मोदी यांनी तीन खेळाडूंना एका उद्योगपतीने लाच दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
सध्या लंडनमध्ये असलेल्या मोदी यांनी शनिवारी एक पत्र टिष्ट्वट केले. त्यात त्यांनी दावा केला आहे की, हे पत्र जून २०१३ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठविले होते. त्यात दोन भारतीय खेळाडू व एका वेस्ट इंडियन खेळाडूने एका उद्योगपतीकडून रोख रक्कम व मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
आयसीसीने आपल्या वेबसाईटवर ई-मेलबाबत स्पष्ट केले आहे की, त्यावेळी नियमानुसार कारवाई करण्यात आली होती. आयसीसीने म्हटले आहे की, ‘ललितकडून २०१३ मध्ये मेल मिळाला होता. हा मेल भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा समितीला पाठविण्यात आला. एसीएसयूने आपल्या पद्धतीनुसार याची चौकशी केली. त्यात बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीसोबत चर्चा करण्याचाही समावेश होता.’

Web Title: Lalit Modi gave information about fixer players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.