ललिता बाबरने मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम

By Admin | Published: August 25, 2015 04:15 AM2015-08-25T04:15:38+5:302015-08-25T04:15:38+5:30

भारताची ललिता शिवाजी बाबर हिने आपला राष्ट्रीय विक्रम मोडताना येथे सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या ३,००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत

Lalita Babar breaks down to break the national record | ललिता बाबरने मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम

ललिता बाबरने मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम

googlenewsNext

बीजिंग : भारताची ललिता शिवाजी बाबर हिने आपला राष्ट्रीय विक्रम मोडताना येथे सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या ३,००० मीटर स्टिपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली.
माजी आशियाई चॅम्पियन ललिताने दुसऱ्या हिटमध्ये ९ मिनिटे २७.८६ सेकंदांचा वेळ नोंदवताना चौथे स्थान मिळवले. तसेच, बुधवारी होणाऱ्या फायनलसाठी ती पात्रही ठरली. या जबरदस्त कामगिरीबरोबरच ललिता सर्वच तीन हिटमध्ये सर्वांत वेगवान अ‍ॅथलिटमध्ये समाविष्ट झाली. त्याचबरोबर ललिताने ६ सेकंद कमी वेळ घेऊन आपला राष्ट्रीय विक्रमही मोडला. तिने जून महिन्यात वुहान येथील चॅम्पियनशिपमध्ये ९ मिनिटे ३४.१३ सेकंद वेळ नोंदवताना विक्रम केला होता. या महाराष्ट्राच्या २६ वर्षीय अ‍ॅथलिटने २०१४च्या आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
विश्व चॅम्पियनशिपच्या ३,००० मीटर स्टिपलचेसमध्ये पात्र ठरणारी ललिता ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. ट्युनिशियाची आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त हबिबी घिरिबीने ९ मिनिटे २४.३८ सेकंद ही सर्वोत्तम कामगिरी करून हिट जिंकली आणि अंतिम फेरीसाठी ती पात्र ठरली. दुसऱ्या स्थानी जर्मनीची जेसा फेलिसितास क्राउसे राहिली. तिने ९ मिनिटे २४.९२ सेकंद वेळ नोंदवली. इथिओपियाची हिवोत आयालियू तिसऱ्या स्थानी राहिली. तिने ९ मिनिटे २५.५५ सेकंद वेळ नोंदवला. (वृत्तसंस्था)

Web Title: Lalita Babar breaks down to break the national record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.