ललिता आठव्या स्थानी

By admin | Published: August 27, 2015 03:51 AM2015-08-27T03:51:38+5:302015-08-27T03:51:38+5:30

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये आघाडी घेतल्यानंतरही भारताच्या ललिता बाबरला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Lalita eighth place | ललिता आठव्या स्थानी

ललिता आठव्या स्थानी

Next

बीजिंग : जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये आघाडी घेतल्यानंतरही भारताच्या ललिता बाबरला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
शानदार सुरुवात केल्यानंतरही अखेरच्या क्षणामध्ये पिछाडीवर पडल्याने ललिता आठव्या क्रमांकावर राहिली. महाराष्ट्राच्या या २६ वर्षीय अ‍ॅथलिटने अंतिम फेरीत ९ मिनिट २९.६४ सेकंद अशी वेळ नोंदवताना जागतिक स्पर्धेत अव्वल ८ क्रमांकामध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय धावपटूचा पराक्रम केला. सुरुवातीला जबरदस्त आघाडी घेतलेली ललिता शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये मागे पडली. केनियाच्या हीविन कियेंगेने सहज बाजी मारताना ९ मिनिट १९.११ सेकंदासह सुवर्ण पटकावले. तर ट्यूनिशीयाच्या हबीबी घरीबी आणि जर्मनीच्या जेसी फेलिसिटास यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले.
याआधी या स्पर्धेत अंजू जॉर्ज (लांब उडी) आणि विकास गौडा (थाळी फेक) यांनी ललिताहून चांगली कामगिरी केली आहे.

Web Title: Lalita eighth place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.